बीड

पंकजा मुंडेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवरून भाजप नेते गायब, कार्यकर्त्यांमध्ये कसली नाराजी?

बीड-परळी / गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांना सतत डावललं गेल्याने पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. तीच नाराजी आता  वाढदिवसाच्या बॅनर वर हे दिसून येत आहे. त्यामुळे या बॅनरची सध्या बीड जिल्ह्यात जास्त चर्चा आहे.

भाजपच्या राष्ट्रीय सचीव पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त (Pankaja Munde Birthday) बीड परळीत ठिकठिकाणी बॅनर लागलेत. आता एवढे मोठे बॅनर लागलेत म्हणल्यावर चर्चा तर होणारच, या बॅनर (Pankaja Munde Banner) वरील एका गोष्टीने मात्र सर्वांचा लक्षं वेधले आहे. कारण या बॅनरवर राज्यातल्या एकाही बड्या भाजप नेत्याचा (BJP) फोटो दिसत नाहीये. काही स्थानिक कार्यकर्त्यांचे फोटो तसेच गोपीनाथ मुंडे यांचा फोटो आणि पंकजा मुंडे यांना शुभेच्छा देणारा त्यांचा फोटो, एवढेच चित्र या बॅनरवर दिसतंय. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांना सतत डावललं गेल्याने पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. तीच नाराजी आता वाढदिवसाच्या बॅनर वर हे दिसून येत आहे. त्यामुळे या बॅनरची सध्या जास्त चर्चा आहे.

कोणत्याही भाजप नेत्याचा फोटो नाही आजकाल राज्यातल्या कुठल्याही भाजप नेत्याच्या बॅनर कडे पाहिल्यास त्यावर तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो तर हमखास दिसतोच. तसेच त्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे फोटो दिसतात. मात्र पंकजा मुंडे या मराठवाड्यातील तसेच भाजपातील एक मोठ्या नेते असून त्यांच्या बॅनरवर कोणत्याही भाजपचा मोठा नेता दिसत नसल्याने सध्या उलट सुलट राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.  तसेच कार्यकर्ते व नेत्यांकडूनही यावर कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र शहरभर लागलेले हे मोठेच्या मोठे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.

गेल्या काही दिवसात डावलल्याने नाराजी

गेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळीतून दारून पराभवाचा सामना करावा लागला .त्यानंतर भाजप पंकजा मुंडे यांची दुसरीकडे कुठेतरी वर्णी लानेल अशा चर्चा अनेकदा झाल्याक अलीकडेच राज्यसभेची निवडणूक लागल्यानंतर पंकजा मुंडे यांचे नाव राज्यसभेसाठी ही चर्चेत आलं. मात्र त्या यादीत ही पंकजा मुंडे यांचे नाव आलं नाही. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा विधान परिषदेसाठीही झाली. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीतही त्यांना डावलण्यात आलं. राज्यात नवं सरकार आल्यानंतर पंकजा मुंडे यांचा नाव काही काळ उपमुख्यमंत्री पदासाठी ही चर्चेत आलं. मात्र शेवटी तसही घडलं नाही आणि वेळोवेळी पंकजा मुंडे यांना यादीतून वगळण्यात आलं.

नाराजीचा परिणाम बॅनरवर

त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराज आहे. गेल्या काही दिवसात देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केली आहेत. तसेच भाजप नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली आहे. त्याचाच परिणाम या बॅनरवर ही दिसतोय.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker