प्रबोधन

बहुगुणी बेलपत्राचे धार्मिक व आयुर्वेदिक महत्व !

Belpatra Leaves : Religious and Ayurvedic importance of Belpatra!

 

Belpatra Leaves : श्रावण महिन्यात हिंदु धर्मियांत बेलपत्राला खुप महत्त्व आहे. श्रावण महिन्यात दररोज महादेवाच्या पुजेमध्ये बेलपत्राच्या वापराला विशेष महत्त्व आहे. बेलपत्रात असलेल्या तीन पानांना ब्रम्हा, विष्णु आणि महेशाचे स्वरुप मानले जाते. बेलपत्र महादेवाला अर्पण करण्याची ही एक विशिष्ट अशी पध्दत आहे. बेलपत्र हे महादेवाला अर्पण करतांना उलट्या बाजूने तीन्ही पानाचा मध्यान भाग महादेवाच्या पिंडीवर येईल अशाच पध्दतीने अर्पण करावे, असे शास्त्र सांगते. यामुळे महादेवांचे मस्तक हे शांत राहते आणि महादेव बेलपत्र अर्पण करणा-या व्यक्ती वर संतुष्ट राहतात असे शास्त्रात सांगितले आहे.

श्रावण महिन्यात मध्ये महादेवाच्या पुजेला अन्यन साधारण महत्त्व आहे. सकाळी लवकर उठून स्नान संध्या आटोपून काहीही न खातापिता महादेवाचा जलाभिषेक करुन त्यास बेलपत्र अर्पण करण्याची हिंदु धर्मियांत रुढ पध्दत आहे. महादेवाच्या स्वभावाप्रमाणे थंड प्रकृतीचे बेलपान भगवान शंकराला खुप प्रिय आहे. श्रावण महिन्यात अतिशय महत्त्वपुर्ण समजल्या गेलेल्या बेलपत्राच्या नुसत्या झाडाच्या दर्शनानेही महादेव प्रसन्न होतात असे शास्त्रात सांगितले आहे.


महादेवावर ताजे बेलपत्र अर्पण करण्यास मिळत नसेल तर महादेवावर अर्पण केलेले बेलपत्र धुवून सर्वत्रच पुसुन पुन्हा अर्पण करण्यास ही मान्यता आहे. धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्व असलेल्या हे बेलपत्र आरोग्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाचे आहे. बेलपत्राच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. बेलपत्राचा उपयोग अनेक समस्या आणि आरोग्याशी संबंधित त्रासापासून मुक्त होण्यासाठी केला जातो. माणसाच्या अनेक दुर्मिळ आजारांवर या बेलपत्राचा, त्याच्या फळांपासून तयार होणाऱ्या रसाचा, पावडरचा औषधी म्हणून ही वापर केला जातो.
आयुर्वेदात बेलपत्राच्या पानाचा कोणकोणत्या आजारांवर औषधी म्हणून उपयोग केला जातो हे आपण जाणून घेऊ.


◼️डोळ्यांच्या समस्या


डोळ्यांमध्ये लालसरपणा, ऍलर्जी, वेदना असल्यास बेलाच्या पानांवर तूप लावा आणि डोळ्यांना शेक द्या. त्यानंतर डोळ्यांवर पट्टी बांधा. यामुळे डोळ्यांच्या समस्यांतून खूप आराम मिळेल.


◼️मधुमेह


मधुमेह असणाऱ्या रूग्णांनी बेलाची पाने बारीक करून, त्याचा रस काढून, दिवसातून दोन वेळा सेवन करावा. काही काळानंतर, याचा सकारात्मक परिणाम दिसू लागेल.


◼️तापावर गुणकारी


ताप आल्यानंतर बेलाची पाने एका ग्लास पाण्यात उकळा. पाणी अर्धे शिल्लक असताना, ते गाळून घ्या आणि चहाप्रमाणे प्या. याने तुम्हाला आराम वाटेल. जर, तोंडात फोड आले असतील, तर बेलाची पाने पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन, चावून चघळत राहा. याने तुम्हाला लवकर आराम मिळेल.


◼️सांधे दुखी


जर हिवाळ्यात सांधेदुखीची समस्या वाढत असेल, तर बेलाची पाने गरम करून वेदना असलेल्या ठिकाणी बांधा. या उपायामुळे काही दिवसांत वेदना कमी होण्यास मदत होईल.


◼️हृदयरोग आणि दम्याचा त्रास


बेलाच्या पानांचा काढा हृदयरोग आणि दम्याच्या रुग्णांसाठी खूप प्रभावी आहे. दररोज नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी या काढ्याचे सेवन केल्याने या समस्या कमी होण्यास मदत होईल.


◼️रक्ताचे प्रमाण वाढवते


मधमाशी आणि अन्य काही कीटक चावल्यास बेलपत्राचा रस जखमेवर लावल्यास आराम पडतो. बदलत्या जीवनशैलीत अनेकांना रक्ताच्या कमरतेची लक्षणे दिसून येतात. वाळलेल्या बेलाच्या गराची पावडर तयार करून गरम दुधात साखरेसोबत रोज एक चमचा घेतल्यास शरीरात नवीन रक्त तयार होण्यास सुरुवात होते.


◼️बेल फळाचे उपयोग


बेलफळ हे छोट्या नारळाप्रमाणे असते. कीड, रोगराई यापासून बचाव करण्यासाठी बेलाच्या झाडावर कसलेही औषध फवारावे लागत नाही. या झाडाचे आयुष्य मोठे असते. बेलफळ नियमित खाल्याने आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे होतात. त्यात मेंदूचे विकार दूर करण्यापासून ते स्मरणशक्ती सुधारण्यास त्याची मदत होते. तसचे पोट साफ रहाणे, पचनशक्ती सुधारण्याबरोबर मुळव्याधीसाठीही बेल उपयुक्त ठरतो. “पचनक्रिया बिघडल्यास तोंडाचा वास व मुखदुर्गंधी, अपचनापासून ते पोटदुखी, बद्धकोष्ठता, उन्हाळ्यात डोळे, हातापायांची जळजळ वा रक्ताची कमी असल्यास बेलाचे फळ खूपच गुणकारी आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखर कर्म करण्यासाठी उपयोगी पडते. विशेष म्हणजे बेलाचे झाड सर्व प्रकारच्या जमिनित लागते व वाढते. बेल हा एकमेव वृक्ष आहे की ज्यात अनेक धर्म ग्रंथात त्याचा उल्लेख आहे व त्याचे औषधी उपयोग ही या धर्म ग्रंथात लिहली आहेत.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker