टेक & ऑटो

Bajaj Pulsar: बजाजची लोकप्रिय बाईक Pulsar नव्या रूपात होणार लाँच; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

बजाज ऑटो (Bajaj Auto) पल्सरला एका नवीन अवतारात लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. बजाज कंपनीने नुकताच एक टीझर प्रसिद्ध केला. यामध्ये कंपनीने पल्सर 250 ब्लॅक एडिशनची (Pulsar 250 Black Edition) झलक दाखवण्यात आली आहे.

Bajaj Pulsar 250 Black Ediation: भारतीय दुचाकी बाजारात बजाज पल्सरची एक वेगळी ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या बाईकने भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. गेल्या दोन दशकांपासून भारतीयांना वेड लावणाऱ्या पल्सरची अनेक मॉडेल्स कंपनीने लाँच केली आहेत. बजाज ऑटो (Bajaj Auto) पल्सरला एका नवीन अवतारात लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. बजाज कंपनीने नुकताच एक टीझर प्रसिद्ध केला. यामध्ये कंपनीने पल्सर 250 ब्लॅक एडिशनची (Pulsar 250 Black Edition) झलक दाखवण्यात आला आहे. गेल्या महिन्यात बजाजची विक्री चांगली झाली आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी पल्सरची रेंज वाढवण्यावर भर देत आहे.

असा आहे बजाज पल्सर ब्लॅक एडिशनचा टीझर:

कंपनीने प्रसिद्ध केलेल्या टीझरमध्ये, मोटरसायकलच्या बाजूचे ग्राफिक्स पाहता, कंपनी बजाज पल्सर 250 ब्लॅक एडिशनला ‘एक्लिप्स’ हे नाव देऊ शकते. बजाज ऑटोच्या वेबसाइटनुसार, या मोटरसायकलचे नाव बजाज पल्सर 250 ब्लॅक असेल. मात्र कंपनीने अद्याप लॉन्चची तारीख जाहीर केलेली नाही.

कॉस्मेटिक लेव्हलवर अनेक बदल:

बजाज पल्सर 250 ब्लॅक एडिशनमध्ये कॉस्मेटिक लेव्हलवर अनेक बदल पाहायला मिळतील. टीझरमध्ये, ही बाईक बजाज पल्सर N250 वर आधारित दिसत आहे, परंतु कंपनी आपली फेअर्ड बजाज पल्सर F250चे ब्लॅक एडिशन बाजारात लाँच करू शकते. रंगासोबतच इंजिन कव्हर, एक्झॉस्ट सिस्टम आणि चाकेसुद्धा काळ्या रंगात मिळतील.

मे महिन्यात 2.75 लाख युनिट्सची विक्री:

बजाज ऑटोने मे 2022 मध्ये एकूण 2.75 लाख युनिट्सची विक्री केली. कंपनीने म्हटले आहे की मे 2021 मध्ये 60,830 वाहनांची विक्री झाली होती आणि या वर्षी मे महिन्यात व्यावसायिक वाहनांच्या देशांतर्गत विक्रीत 85 टक्के वाढ झाली आहे. या मे 2022 मध्ये कंपनीने 1,12,308 वाहनांची विक्री केली आहे.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker