अटलबिहारी वाजपेयी स्मृतीदिन विशेष; और एक राजा भोज चला गया…!
Atal Bihari Vajpayee Memorial Day Special; And a king went to Bhoj...!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/atal-bihari-vajpayee.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/atal-bihari-vajpayee.png)
भारतामधील दोन पंतप्रधान हे खऱ्या अर्थाने राजा भोज होते……एक लालबहादूर शास्त्री आणि दुसरे अटलबिहारी वाजपेयी . ह्या दोघानी देशाच्या मनात , लोकांच्या मनात स्थान अढळ मिळवले तसे कुणीही मिळवले नाही, लालबहादूर शास्त्री यांना दुर्देवाने जास्त कालखंड मिळाला नाही. तरीसुद्धा जगाच्या मनात स्थान मिळवले, विरोधी पक्षाच्या मनात देखील स्थान मिळवले . तसेच अटलबिहारी वाजपेयी यांना प्रदीर्घ कालखंड मिळाला आणि त्यांचे स्थान विरोधकांच्या मनात देखील मिळाले.
काही वर्षांपूर्वी मुंबईमधील राजा शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात मराठी साहित्य संमेलन होते , प्रेक्षकांमधील सातव्या का आठव्या रांगेत बाळ कोल्हटकर आणि अटलबिहारी वाजपेयी बसलेले होते. त्यांचा तेव्हा मी फोटोही काढला होता. कारण प्रेक्षकांमध्ये बसलेले अटलबिहारी हा दुर्मिळ क्षण होता. त्या काळात अटलजींची भाषणे म्हणजे दुर्मिळ पर्वणीच असे. त्यांचे सुस्पष्ट हिंदी , बोलण्याचा ओघ , मध्येच पॉज घेऊन प्रेक्षकांच्या हास्याला ते वाट मोकळी करून देत असत. त्यावेळी मला राहून राहून जाणवत होते अटलजींकडे सर्व गुण आहेत अगदी चरित्राभिनेत्यात आहेत तसे. ते राजकारणात गेले म्हंणून नाहीतर चरित्रभेनेता म्हणून त्यांनी निश्चित अशॊकुमारचे मार्केट खाल्ले असते . अटलजी पंतप्रधान झाले , परंतु त्यानंतर जबाबदारी म्हणून धमाल भाषणावर त्यांनी थोडा ताबा मिळवलेला होता. कारण पंतप्रधान झाल्यावर काय बोलावे आणि काय बोलू नये ह्यांचे त्यांना पूर्ण भान होते , म्हणून त्यांची पंत्रप्रधान झाल्यनंतरची भाषणे आणि आधीची भाषणे यात खूप फरक जाणवत असे कारण त्यांना पंतप्रधान या पदाचे भान होते अनेकांना ते नसतेही , असो…
![atal bihari vajpayee](http://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/atal-bihari-vajpayee-1-1024x576.png)
![atal bihari vajpayee](http://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/atal-bihari-vajpayee-1-1024x576.png)
एकदा ते ठाण्यामधील घंटाळी येथे भाषणासाठी आले असताना , एका कार्यकर्त्याच्या भाषणानंतर ते त्यासारख्या घरी गेले होते , मी पण तेथे गेलो , त्यांची स्वाक्षरी घेतली , माझ्या हातात लहान कॅमेरा होता , म्हटले अटलजी एक फोटो चाहिये , माझ्याकडून बघत म्हणाले , ‘ अरे हारा हुवा थोबडा है , क्यू फोटो निकालते हो .’ आणि खळखळून हसले , मी फोटो मात्र काढला , त्यांनी फोटोसाठी पोज दिली होती. कारण त्यावेळी त्यांची जनता पार्टीची स्वप्ने भंगली होती. घंटाळीच्या भाषणामध्ये ते सहज म्हणाले हम जीत गये , लेकिन इतनी उचाई पर चले गये वहा तक कोई गया नही .’ आणि हसून पुढे म्हणले , ‘ जितने नीचे चले गये वहा तरक भी कोई गया नही .’ कारण त्या वेळी पक्षात अंतर्गत दुफळी माजली आणि परत इंदिराजी निवडून आल्या होत्या.
एकदा मोरारजी देसाई यांच्याबरोबर रशियात गेले होते , तेव्हा मोरोरजीभाईनी भाषण दिले त्यांनी बरेच उपदेशाचे डॉस पाजले त्यातला एक होता, दारू पिऊ नका, रशियात तापमान -२० किंवा त्यापेक्षा जास्त . झाले मुले अटलजींकडे त्याना त्यानी दारूचा उपदेश सांगितला तेव्हा अटलबिहारी यांनी अशी काही खूण केली की मुले समजून गेली.
सर्व स्तरामध्ये सहजपणे पण कुठलाही दंभ न बाळगणारा हा नेता असामान्य होताच होता परंतु दुसऱ्याचा सन्मान ते राखत असत , त्यांच्या कार्यांचा सन्मानदेखील त्यांच्या मृत्यूनंतर राखत असत. असा नेता परत होणे नाही , त्यांचे नुसते असणे देखील नीतिमत्तेची खूण होती , नीतिमत्ता असण्याची खूण होती. मी त्यांची खूप भाषणे प्रत्यक्ष ऐकली आहेत . आजही त्यांचे बोलणे , त्याचे शब्द कानात , मनात घुमत आहेत.
सही वह सचमुच राजा आदमी था ….
परंतु आज दुर्देवाने राजकारणात जास्तीत जास्त…..नमुनेच दिसतात ?
सतीश चाफेकर