अनिल पाटील बोरगावकर यांचा राष्ट्रीय सेवेचा उपक्रम
तब्बल 707 तिरंगा ध्वज जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/nanded-anil-borgonkar.png)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/08/nanded-anil-borgonkar.png)
नांदेड / संतोष कुलकर्णी : आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस साजरा करत असताना अन्नदान, कपडे वाटप, मिठाईवाटप, पुस्तके वाटप असे अनेक उपक्रम वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून राबविले जातात. परंतु राष्ट्रीय विचारांचे अधिष्ठान असणाऱा भाजपा पक्ष हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यांमध्ये अग्रेसर असतो. हे भाजपाचे कार्यकर्ते आपल्या कामातून दाखवून देत असतात. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अनिल पाटील बोरगावकर यांनी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत 707 तिरंगा ध्वज जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करत राष्ट्रसेवा केली आहे .अनिल बोरगावकर यांच्या या राष्ट्रीय उपक्रमाचे शासन, प्रशासन आणि समाज मनातूनही कौतुक होते आहे.
खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस जिल्हयाभरात नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त नांदेड शहर आणि जिल्ह्यात तब्बल पन्नासहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सहसचिव अनिल पाटील बोरगावकर यांनी आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. यावर्षी अनिल पाटील बोरगावकर यांनी राष्ट्रीय सेवेत सहभाग नोंदवला.
जगातील कणखर नेतृत्व, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हर घर तिरंगा या अभियानात आपलाही सहभाग व्हावा आणि आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त सामान्य लोकांच्या घरावर तिरंगा स्वाभिमानाने फडकावा या उद्देशातून बोरगावकर यांनी तब्बल 707 तिरंगा ध्वज जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. यावेळी विशेष पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोली, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर ,पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.अनिल पाटील बोरगावकर यांच्या या राष्ट्रीय उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी, शासन प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांनी ही कौतुक केले आहे.
परस्पर सहयोगातून ही मोहिम यशस्वी केली जाईल
प्रत्येक घरावर तिरंगा लागावा यासाठी दिनांक 11 ते 17 ऑगस्ट हा कालावधी निश्चित केला आहे. “हर घर तिरंगा” साठी प्रत्येक नागरिक आपल्या घरावर तिरंगा लावेल असा विश्वास डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. या उपक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, प्राथमिक-माध्यमिक शाळा, ग्रामीण आरोग्य केंद्र, उपकेंद्र, तालुका पातळीवर पंचायत समिती, तहसील कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व जिल्हा कार्यालयाच्या परस्पर सहयोगातून ही मोहिम यशस्वी केली जाईल. “हर घर तिरंगा” या अभिनव उपक्रमात नांदेड जिल्हा आपल्या राष्ट्रकर्तव्याप्रती वेगळी मोहोर उमटवेल असा विश्वासही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बोलून दाखविला
सहभाग स्वतंत्र ॲपद्वारे नोंदविला जात आहे
या मोहिमेला लागणारे ध्वज याच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील बचतगटांना प्रोत्साहित केले जात आहे. याचबरोबर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था यांचा सहभाग घेतला जाईल. प्रत्येक व्यक्तीचे या उपक्रमात योगदान अभिप्रेत असून हा सहभाग स्वतंत्र ॲपद्वारे नोंदविला जात आहे. यासाठी नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे पुढे येऊन आपल्या घराच्या पत्त्यासह असलेली माहिती https://harghartirangananded.in या लिंकवर भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. सर्वसामान्यांना सहज माहिती भरता येईल असा पद्धतीने हे ॲप विकसित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.