Uncategorizedराष्ट्रीय

अंबाजोगाईच्या “आई” सेंटरची जागतिक विक्रमाची नोंद; सर्वात जास्त लांबीचा फडकवला राष्ट्रध्वज !

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रध्वज सर्वात उंच जागेवर १५ ऑगस्ट २०२२ रोजी फडकवण्याचा जागतिक बहुमान अंबाजोगाई येथील “आई” सेंटर ( इन्फॉर्मेशन एक्सचेंज सेंटर) ला मिळाला आहे. सदरील जागतिक विक्रम केल्याच्या नोंदीचे प्रमाणात आई सेंटरचे संचालक नागेश जोंधळे यांना नुकतेच प्राप्त झाले असून त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
या संदर्भात द आयडीयल इंडीयन बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेच्या वतीने नागेश जोंधळे यांना प्राप्त झालेल्या पत्रात असे म्हटले आहे की,
” सर नागेश जोंधळे, आम्हाला तुमच्या रेकॉर्डचे तपशील मिळाले आहेत आणि तुमचे रेकॉर्ड स्वीकारले गेले आहे. सदरील मिळालेल्या माहितीनुसार आपण “इन्फॉर्मेशन एक्सचेंज सेंटर” अर्थात “आई” सेंटर ने फडकवलेला सर्वात ज्यास्त लांबीचा भारतीय ध्वज आणि जास्तीत जास्त सहभागींसह फडकावणारी भारतातील पहिली शैक्षणिक संस्था ठरली आहे.


आपण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रध्वज शिक्षण संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांसह आणि संस्थेच्या हितचिंतकांसह ऐतिहासिक निसर्गरम्य ठिकाण टीव्ही सेंटर, अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र, भारत येथे महाराष्ट्र येथे फडकावला. या उपक्रमाची नोंद भारतातील सर्वात मोठ्या शैक्षणिक टीम सदस्यांसह सर्वात ज्यास्त लांबीचा भारतीय ध्वज फडकवला. अशी ठरली आहे. हा उपक्रम सर नागेश जोंधळे “आई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था” चे अध्यक्ष, संस्थापक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील पहिल्या क्रमांकाचे “बेस्ट सेलिंग लेखक” नागेश जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्याने करणे शक्य झाले आहे. १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताला ऐतिहासिक ७५ वा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला आणि हा महोत्सव “आझादी का अमृत महोत्सव” म्हणून ओळखला जातो. म्हणून ही घटना विशेष उल्लेखनीय आहे.


सदरील “द आयडिअल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स” या संस्थेच्या वतीने हे पत्र आई सेंटरचे संचालक नागेश जोंधळे यांना नुकतेच प्राप्त झाले असून सदरील सन्मानाबध्दल या उपक्रमात यशस्वी नेतृत्व करणारे विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे यांच्यासह विशेष सहभागी झालेले स्वारातीचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, कृषी महाविद्यालय लातूरचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, अंबाजोगाई दूरदर्शन केंद्रप्रमुख इंजि.सदाशिव चापुले, मेडिसिन विभाग प्रमुख डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, छाती विकार तज्ज्ञ डॉ.राहुल धाकडे, ज्येष्ठ पत्रकार तथा माध्यम न्यूज नेटवर्क चॅनलचे संपादक सुदर्शन रापतवार, ज्येष्ठ पत्रकार जगन सरवदे, पञकार दादासाहेब कसबे, पञकार रणजित डांगे, प्रा.डॉ.इंद्रजीत भगत, प्रा.डॉ.अनंत मरकाळे, प्रा.डॉ. किरण चक्रे, कवी राजेश रेवले, अरूण शिंदे, राष्ट्रध्वज टेलर महादेव पुदाले या मान्यवरांसह आई सेंटरचे सर्व पदाधिकारी, हितचिंतक सर्व फॅमिली मेंबर्स यांनी नागेश जोंधळे यांचे विशेष आभार मानले आहेत.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker