अंबाजोगाई

अंबाजोगाईचा शैक्षणिक दर्जा उंचावणाऱ्या ‘आई सेंटर’ ला मिळाले आंतरराष्ट्रीय आयएसओ मानांकन

अंबाजोगाई येथील इन्फॉर्मेशन एक्सचेंज सेंटर अर्थात ‘आई सेंटर’ म्हणजे माहिती विनिमय केंद्र होय, हे केंद्र आज ग्रामीण व शहरी भागातील तरूणांसाठी आशेचा किरण ठरले आहे. तरूणाईला सक्षम करून त्यांना २१ व्या शतकातील क्रांतिकारक बदल स्विकारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. विज्ञान व तंत्रज्ञाना सोबतच संपूर्ण जगाला जोडणारी इंग्रजी भाषा व संभाषण कौशल्य यांचे प्रशिक्षण देणारे व करिअर मध्ये तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रम, पदविका, पदवी, पदव्युत्तर शिक्षण सोबतच कुशल तथा यशस्वी व्यक्तिमत्व घडविण्यासाठी आई सेंटर हे नांव आज अग्रस्थानी आहे. अंबाजोगाईचा शैक्षणिक दर्जा उंचावणाऱ्या ‘आई सेंटर’च्या यशात विशेष भर पडली आहे. नुकतेच इन्फॉर्मेशन एक्सचेंज सेंटर अर्थात ‘आई सेंटर’ला आयएएफ : आंतरराष्ट्रीय मान्यता मंच यांचेकडून आंतरराष्ट्रीय आयएसओ ९००१:२०१५ मानांकन प्रमाणपत्र क्रमांक- २२इक्यूएचवाय१२ सह प्राप्त झालेले आहे अशी माहिती विश्वविक्रमवीर प्रशिक्षक, अमेझॉन बेस्ट सेलिंग ठरलेले ‘द डायनॅमिक कम्युनिकेटर’ या पुस्तकाचे लेखक तथा आई सेंटरचे संस्थापक सर नागेश जोंधळे यांनी दिली आहे. आई सेंटरच्या स्पृहणीय कामगिरी बद्दल शैक्षणिक क्षेत्रातून सर नागेश जोंधळे यांचे अभिनंदन होत आहे.

मागील एक दशकाहून अधिक कालावधीत सातत्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, शिक्षण संस्था, महाविद्यालय, व्यावसायिक व उद्योजक तसेच सामाजिक क्षेत्रात आपल्या नाविन्यपूर्ण व उपयुक्त असे सेमिनार्स, वर्कशॉप्स (कार्यशाळा), ऑनलाइन बेबिनार्स व विविध कोर्सेसच्या माध्यमातून केवळ अंबाजोगाईच्याच खेड्या-पाड्यांपासून नव्हे तर ते शहर, तालुका, जिल्हा, राज्य व देश पातळीवर तथा आंतरराष्ट्रीय पातळीवरील जर्मनीसारख्या प्रगतशील देशातील व्यक्तींमध्ये देखील परिवर्तन घडवून आणणारे तसेच जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि निकाल देणारी संस्था म्हणून आई सेंटर हे नांव आज सर्वदूर प्रचलित झाले आहे. आई सेंटरचे मिशन : ‘सशक्त राष्ट्र निर्माण करण्यासाठी तरूणांना सक्षम बनविणे’ हे असून आई सेंटरने  गुणवत्तापूर्ण शिक्षण, आत्मविश्वास, स्वाभिमान आणि व्यावसायिकता ही  मूल्ये समाजमनात रूजविली आहेत. आई सेंटर हे इंग्रजी संभाषण कौशल्य ( इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स ), व्यक्तिमत्व परिवर्तन (पर्सनॅलिटी ट्रान्सफाॅर्मेशन ), मुलाखत तंत्र ( इंटरव्ह्यू स्किल्स ), गट चर्चा ( ग्रुप डिस्कशन ), सभाधीटपणा (स्टेज करेज ),  इंग्रजी व्याकरण अभ्यासक्रम ( इंग्लिश ग्रामर ), विद्यार्थी विकास कार्यक्रम ( स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम ), नेतृत्व विकास कार्यक्रम ( लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम ), ट्रेन द ट्रेनर/टीचर , व्यवसाय आणि संस्था विकास कार्यक्रम ( बिझनेस अँड ऑर्गनायझेशन ग्रोथ प्रोग्राम ) आणि उद्योजकता (आन्ट्रप्रनर्शिप) इत्यादींचे एक अग्रगण्य प्रशिक्षण केंद्र आहे. सर्व महापुरूषांसह, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मेंटाॅर्स ब्रायन ट्रेसी, जॉन मॅक्सवेल, टोनी रॉबिन्स यांच्यासह लाखो विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान असलेले व सर जोंधळे यांना वयाच्या १८ व्या वर्षी प्रशिक्षक म्हणून संधी देणारे आयकॉनिक आयपीएस ऑफिसर विश्वास नांगरे पाटील सर (सहआयुक्त – कायदा व सुव्यवस्था, मुंबई) या सर्वांच्या प्रेरणादायी व सक्षम विचाराने आई सेंटर हे शालेय व महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनींना, नोकरीच्या व नवीन संधीच्या शोधात असलेल्या तरूणांना, नोकरदारांना, अधिकारी व कर्मचारी, ग्रहिणी, व्यावसायिकांना, व्यवसायांचे मालक आणि उद्योजकांना जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात नेतृत्व करण्यासाठी त्यांच्या जास्तीत जास्त क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावीपणे प्रशिक्षण देत आहे. आई सेंटरच्या माध्यमातून संस्थेचे तथा स्वकर्तृत्व सिद्ध करीत असताना संस्थापक सर नागेश जोंधळे यांना आज पर्यंत विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून मानसन्मान, पुरस्कार व प्रमाणपत्रेही प्राप्त झालेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार, तीन जागतिक विश्वविक्रम व चार बेस्ट सेलिंग पुस्तकांचा सामावेश असून ‘सर’, जीवन पुष्प, उद्योन्मुख व्यक्तिमत्व, समाज भूषण, भारतातील सर्वात तरूण लेखक अशी विविध पदवी / उपाधी ही मिळालेली आहेत. आपल्या १९ वर्षांच्या प्रदीर्घ स्वानुभवातून त्यांनी आजपावेतो पंधराशे पेक्षा अधिक सेमिनार्स, वर्कशॉप्स, बेबिनार्स घेत असताना चार लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी व प्रोफेशनल्स यांना प्रभावित केलेले असून सतरा हजारांपेक्षा अधिक तरूणांना प्रशिक्षित करण्याचे कार्य केलेले आहे. याचेच फलित म्हणून आज ग्रामीण व शहरी भागातील हजारो तरूण – तरूणांसाठी आई सेंटर हे ‘टर्निंग पॉईंट’ ठरले असून हे तरूण राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्या तसेच, शासकीय व निमशासकीय संस्था यामध्ये ऐटीत मानाच्या पदावर नोकरी करताना दिसत आहेत. तर काहींनी व्यवसाय व उद्योजक क्षेत्रात गरूडझेप घेतलेली आहे. याबाबत बोलताना विश्वविक्रमवीर प्रशिक्षक सर नागेश जोंधळे यांनी सांगितले की, आई सेंटरसाठी तसेच देशाच्या व जगाच्या कानाकोपऱ्यातून जोडले गेलेले हजारो तरूण व महत्त्वकांक्षी लीडर्स यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय आयएसओ मानांकन हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे प्रमाणपत्र आमचे कठोर गुणवत्ता, सेवा आणि आमच्या कार्यकर्तृत्व प्रक्रियेत सातत्यपूर्ण सुधारणा करण्याची वचनबद्धता स्पष्ट करते.

तसेच विद्यार्थी, पालक व ज्ञानार्जनासाठी सतत उत्साही असणारे शिक्षणप्रेमी ज्यांना वैयक्तीक तसेच व्यावसायिक प्रगती करायला आवडते यांच्यासाठी नाविन्यपूर्ण, उच्च दर्जाचे आणि विद्यार्थी व त्यांनी निवडलेल्या विविध क्षेत्रात नेतृत्व करणारी सक्षम पिढी तयार करण्यासाठी व राष्ट्राला तसेच विश्वाला सशक्त बनविण्यासाठी आमच्या अविरत प्रयत्नांमध्ये हे प्रमाणपत्र एक आवश्यक घटक असेल असा विश्वास जोंधळे यांनी व्यक्त केला. आई सेंटरच्या या यशस्वी वाटचाली मध्ये जीवनातील पहिले गुरू व आदर्श आई-वडील शांताबाई व भुजंगराव जोंधळे, के उत्पलवर्णा व परमेश्वर जोंधळे यांचेसह शाळेतील प्रेरणादायी शिक्षक अशोक चिखले, शोभा व गोपाळराव पवार, लता व त्रिलोक वाकळे, अल्का व डॉ.विक्रम साळवे, आश्विनी व बाळासाहेब निरगुडे, स्वाती नागेश जोंधळे, उद्घाटक प्रा.श्रीराम शेप, अरूण पिंपळे काका, शल्यचिकित्सक डॉ.निकेतन जांभुळकर, ज्येष्ठ पत्रकार जगनबापू सरवदे, स्व.समाजसेवक डॉ.द्वारकादासजी लोहिया (बाबूजी), पो. नि.प्रदीप त्रिभुवन, बीडीओ अंकुश चव्हाण, आदर्श शिक्षिका व प्रशासक प्रतिभा देशमुख व सुरेखा खंडाळे, माया गजभारे, कमल डोंगरे, ज्योती गायकवाड, सजग पालक सोमनाथ विभुते, डॉ.बबन मस्के, अरूण शिंदे, विजय भोसले, सुनिल जळकोटकर, दादासाहेब कसबे, प्राचार्य डॉ.दिलीप चव्हाण, प्रा.प्रदीप रोडे,

Nagesh Jondhale
Nagesh Jondhale

डिक्की – पुणेचे संस्थापक पद्मश्री डॉ.मिलिंद कांबळे, आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक आनंद बनसोडे, अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे, प्राचार्य डॉ.रमेश इंगोले, डॉ.किर्तीराज लोणारे, प्राचार्य डॉ.आर.डी. जोशी, डॉ.आर.व्ही.कुलकर्णी, तहसिलदार चंद्रकांत नाना जोगदंड, इंटरएडव्हाइज – मुंबईचे सीईओ कामेंद्र दहाट, डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, रोगप्रतिकार तज्ज्ञ तथा आई रत्न डॉ.प्रशांत दहिरे, दंतरोग तज्ज्ञ डॉ.अविनाश काशीद, आई रत्न गणेश तौर, समाजसेवक राजेंद्र घोडके, उपसंचालक डॉ.राजपाल कोल्हे, तरूण उद्योजक सचिन थोरात, सदाशिव सोनवणे, डॉ.किरण चक्रे, विकास वाघमारे, माजी मुख्याध्यापक  शिवकुमार निर्मळे, प्राचार्य दि.ना.फड, सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले, बेनके गुरूजी प्रतिष्ठान,पुणेचे संस्थापक सुनिल बेनके, प्रख्यात लेखक व प्रकाशक डॉ.इंद्रजीत भगत,  छातीविकार तज्ज्ञ डॉ.राहुल धाकडे, लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्कचे संपादक रणजित डांगे,  फिनिक्सचे संस्थापक नागसेन कांबळे आदी मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन व सहभाग याच बरोबर आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व जेफ अल्टगिलबर्स (युएसए), बेटीना गोयडके – ओबिगलो (जर्मनी), डॉ.पुव्हेण मुथैया (ऑस्ट्रेलिया), हेमंतकाका पवार (कॅलिफोर्निया), अक्षय खोब्रागडे (जपान) यांचे आई सेंटरच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत मेंटाॅर्स म्हणून निभावत असलेली भूमिका आणि आई सेंटरचे विविध ठिकाणातील फ्रॅंचाईजी डायरेक्टर्स व डायनॅमिक लीडर्स यामध्ये संदीप अंबेसंगे (पुणे), करम पाल, आरती यादव, शिल्पा राव (गुरूग्राम – हरियाणा), राजेश मिश्रा (दिल्ली), रश्मी राव, इंजि.गौरव लखेरा, नवनीत उनियाल, अंकित देवरानी (उत्तराखंड), विश्वविक्रमवीर तथा प्रेरणादायी वक्ते राहुल बनसोडे (नाशिक), अमरदीप वाकळे (परभणी), इंजि.प्रतिक गौतम (गोंदिया) या सर्वांचे अथक परिश्रम व टीम वर्क तसेच आई सेंटरचे सर्व फॅमिली मेंबर्स, मित्रपरिवार यांचा प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे असलेला सहभाग यामुळे आम्ही यापुढेही अधिक उत्साहाने कार्यरत राहणार आहोत अशी ग्वाही आई सेंटरचे संस्थापक सर नागेश जोंधळे यांनी दिली आहे.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker