… या वेळेचे सगळे नॅशनल सिने पुरस्कार मराठी चित्रपटांना
धर्मवीर चित्रपटाने मराठी चित्रपट सुर्ष्टीचंच नाही तर राजकारण सुद्धा तापवले

धर्मवीर चित्रपटाने मराठी चित्रपट सुर्ष्टीचंच नाही तर राजकारण सुद्धा तापवले
ठाणे शहर आणि जिल्ह्यात शिवसेना हा पक्ष रुजवणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनपट “धर्मवीर” मुक्काम पोस्ट ठाणे…या चित्रपटाच्या माध्यमातून रसिकप्रेक्षकांसमोर मांडण्यात आला होता.१३ मे ला सर्वत्र प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम लाभल्यानंतर आता या चित्रपटावर पुरस्कारांचाही वर्षाव होऊ लागला आहे.
“फक्त मराठी सिने सन्मान २०२२” च्या पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाने तब्बल ७ पुरस्कार पटकावले आहेत. ज्यामध्ये सर्वात्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट लेखन प्रविण विठ्ठल तरडे, सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रसाद ओक, सर्वोत्कृष्ट गीतलेखन मंगेश कांगणे, सर्वोत्कृष्ट गायक आदर्श शिंदे, सर्वोत्कृष्ट रंगभूषा विद्याधर भट्टे यांना मिळाले आहेत
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
— Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) April 13, 2022
मनःपूर्वक आभार
Mangesh J Desai
आणि Pravin Vitthal Tarde
आणि मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब
हि "सुवर्णसंधी" मला दिल्याबद्दल…!!!
आणि "दिघे साहेब" सांभाळून घ्या…
तुमचा आशीर्वाद कायम असू द्या पाठीशी🙏🙏🙏
सगळेच राजकारणी सारखे नसतात
काही ‘आनंद दिघे‘ असतात pic.twitter.com/EJMKtnVSOu
अभिनेता मंगेश देसाई यांच्या साहील मोशन पिक्चर्सनं आणि झी स्टुडिओजने “धर्मवीर” या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रवीण तरडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.स्वरूप स्टुडिओजने लाईन प्रोड्युसर म्हणून काम पाहिलेल्या या चित्रपटात प्रसाद ओक, श्रुती मराठे, गश्मीर महाजनी, क्षितिश दाते, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, अभिजित खांडकेकर, मोहन जोशी, स्नेहल तरडे आदींच्या भूमिका आहेत.

‘धर्मवीर’ चित्रपटाला तब्बल ७ पुरस्कार!
चित्रपटाने तब्बल ७ पुरस्कार पटकावले आहेत. ज्यामध्ये सर्वात्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट लेखन प्रविण विठ्ठल तरडे, सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रसाद ओक, सर्वोत्कृष्ट गीतलेखन मंगेश कांगणे, सर्वोत्कृष्ट गायक आदर्श शिंदे, सर्वोत्कृष्ट रंगभूषा विद्याधर भट्टे यांना मिळाले आहेत.