अक्षय मुंदडा ठरले नंदकिशोर मुंदडा यांच्या विजयाचे शिल्पकार !

अंबाजोगाई नगर परिषदेच्या अध्यक्ष पदाचा निकाल नुकताच जाहीर झाला. माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी आणि नंदकिशोर मुंदडा यांच्या मध्ये ही सरळ निवडणूक झाली. सुरुवातीला एकदम अतीतटीची वाटणारी ही निवडणूक निकाल सुरु होताच एकतर्फी होत असल्याचे दिसून येत होते.
नगराध्यक्ष पदाच्या सुरु झालेल्या मतमोजणीत पहिल्या राऊंडमध्येच नंदकिशोर मुंदडा यांनी २०० मतांची आघाडी घेवून आपली घोडदौड सुरू केली आणि शेवटच्या फेरीपर्यंत ही घोडदौड कायम ठेवली. सहाव्या फेरी अखेर २५१० मतांची आघाडी घेवून नंदकिशोर मुंदडा विजयी झाल्याचे समजते. नंदकिशोर मुंदडा यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
नंदकिशोर मुंदडा यांच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचाराची धुरा सुरुवातीपासूनच आ. नमिता मुंदडा आणि अक्षय मुंदडा यांनी यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. या दोघांपैकी अक्षय मुंदडा यांनी न. प. निवडणूका जाहीर होण्यापूर्वी योगेश्वरी मंदीर परीसरातील उद्यानाच्या भुमीपुजननाच्या औपचारिक कार्यक्रमात केलेल्या भाषणात अक्षय मुंदडा यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण्याअगोदरच केलेल्या आपल्या संयमी भाषणात येणाऱ्या निवडणुकीत आ. नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली ही नगर परिषद ताब्यात दिली तरच शहराचा खरा विकास आम्हाला करता येईल हा सुरु धरला होता. पुढे हा सुरु कायम धरत अक्षय मुंदडा यांनी निवडणूक प्रचारात आघाडी मारली.

अक्षय मुंदडा ठरले विजयाचे शिल्पकार!
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नंदकिशोर मुंदडा यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर अक्षय मुंदडा यांनी प्रचार आघाडी मारली. नगर परिषदेच्या मागील काळात झालेल्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे पुराव्यासह चव्हाट्यावर आणली. आपल्या प्रचार भाषणात सातत्याने अक्षय मुंदडा यांनी हे मुद्दे प्रभावीपणे मतदारांसमोर मांडले. यांचा खुप मोठा परीणाम या निवडणुकीत मतदारांवर झालेला दिसतो.
विधानसभा निवडणुकीत आ. नमिता मुंदडा यांना विजयी करण्यासाठी नंदकिशोर मुंदडा यांनी आखलेल्या व्युह रचनेमुळे आ. नमिता मुंदडा यांच्या विजय झाला तर नगर परिषदे निवडणुकीत अक्षय मुंदडा यांची व्युहरचना नंदकिशोर मुंदडा यांना विजयी करण्यात कामी आली.
अक्षय मुंदडा हे गेली २० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. राजकारणात काम करीत असतांना अक्षय मुंदडा यांनी मागील काही वर्षात स्वतः ला खुप डेव्हलप करुन घेतले आहे. आपल्या भाषणाचा स्तर, बोलण्यातला स्पष्ट आणि मुद्देसूद पणा या निवडणुकीत मतदारांवर प्रभाव करणारा ठरला. अक्षय मुंदडा यांची ही डेव्हलपमेंट या निवडणुकीत प्रकर्षाने दिसून आला. या निवडणुकीत नंदकिशोर मुंदडा यांच्या विजयाचे शिल्पकार ख-या अर्थाने अक्षय मुंदडा हे ठरतील.
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नंदकिशोर मुंदडा हे विजयी झाले असले तरी त्यांना नगरसेवक पदाचे उमेदवार अधिक निवडून आणण्यात त्यांना यश मिळाले नाही. राजकिशोर मोदी यांच्या गटाचे जवळपास २० तर नंदकिशोर मुंदडा यांच्या गटाचे ११ नगरसेवक या निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यामुळे नगर परिषदेचा कारभार सर्व नगर सेवकांना सांभाळून करतांना नंदकिशोर मुंदडा यांना कसरत करावी लागणार आहे.
कोणत्याही निवडणुकीमध्ये विजय पराजय हा ठरलेलाच असतो. त्यामुळे विजयी झालेल्या उमेदवारांनी आणि पराजित झालेल्या उमेदवारांनी आप आपसातील मतभेद कायम विसरुन शहरातील सामाजिक एकोपा ठेवण्यासाठी काम करणे आवश्यक आहे. या निवडणुकीत भरभक्कम मताधिक्याने विजयी झालेल्या नंदकिशोर मुंदडा व विजयाचे शिल्पकार ठरलेल्या आ. नमिता मुंदडा व अक्षय मुंदडा यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

