

दिनांक १ ऑगस्ट “महसूल दिन” म्हणून महसूल विभागा मार्फत साजरा केला जात असून महसूल विभागामध्ये येणारे अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई कार्यालया मार्फत मागील वर्षभरात केलेल्या कामकाजाचा व चालू कामाचा आढावा दिनांक १ ऑगस्ट “महसूल दिन” या विशेष दिनानिमित्त जनतेसमोर ठेवण्यास मला आनंद होत असे सांगत अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांनी मागील वर्षभरात केलेले व चालू असलेले कामकाजाचा पुढील आढावा ठेवला.
1) अपिल प्रकरणांचा निपटारा :-
अपील प्रकरणात सुनावणी घेऊन देवस्थान इनामा सहित इतर अपील प्रकरणात 162 प्रकरणात गुणवत्तेवर निर्णय पारित करून सामान्य जनतेचे जमिनी विषयक बाबींचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
2) ई-टपाल :-
ई-टपाल प्रणालीचे प्रशिक्षण अधिनस्त कर्मचारी यांना देऊन ई-टपाल प्रणालीचा यशस्वीपणे वापर कार्यालयात सुरु केला.ई-टपाल सॉफ्टवेअर कार्यप्रणालीचा वापर करुन कार्यालयीन कामकाज जलदगतीने पार पाडले जात आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे वेळेत पार पडण्यास मदत होत आहे.
3) ई-पीकपाहणी :-
ई-पीक पाहणी बाबत कार्यक्षेत्रातील तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्या बैठका घेऊन याबाबत प्रभावीपणे व जलदगतीने कामकाज करुन घेण्यासाठी प्रयत्न केले.
4) महसूल व गौणखनिज वसुली :-
चालू आर्थिक वर्षातील शासनाने ठरवुन दिलेले महसूल व गौणखनिज वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत अधिनस्त उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना बैठका घेऊन सुचना केल्या व सतत पाठपुरावा केला.
5)अकृषक विषयक कामकाज :-
औद्योगिक अकृषक बाबत बैठका घेऊन परिपूर्ण प्रस्तावावर अकृषक परवानगी दिली व परवानगी मध्ये वृक्ष लागवडी बाबत अटीचा समावेश करून वृक्ष लागवड वाढविण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले.
6) विविध चौकशी प्रकरणे (देवस्थान इनाम,नगरपालिका,महसूल यंत्रणा) :-
अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई यांचे कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधी यांचे संदर्भ असलेले प्रकरणे,मा.विभागीय आयुक्त यांचे संदर्भ असलेले प्रकरणे,मा.मुख्यमंत्री महोदय संदर्भ प्रकरणे, स्वा.रा.ती.रुग्णालयाबाबत
तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने ,नगरपरिषद चौकशी अर्जाच्या अनुषंगाने तत्परतेने चौकशी करुन अंतिम अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केले.
7) कार्यालयीन रचना व कार्यपध्दती
अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई यांचे कार्यक्षेत्रातील अधिनस्त उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय यांनी रचना कार्यपध्दतीनुसार कामकाज करणेबाबत वेळोवेळी अचानक कार्यालयीन तपासणी करुन योग्य त्या सुचना देण्यात आल्या.
8) कोविड :-
एप्रिल 2021 व मे 2021 मध्ये आलेल्या कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये स्वा.रा.ती.रुग्णालय अंबाजोगाई,लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटर व तालुक्यातील कोविड सेंटरला भेटी देऊन कामकाजाचा आढावा,ऑक्सीजन ऑडीट व कोविडच्या अनुषंगाने प्रशाकीय कामकाज केले.तसेच कोविड बाबत प्रतिबंधात्मक कार्यवाही बाबत शासनाने घालून दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन होणेबाबबत कामकाज केले. ऑक्सिजन प्लांट बाबत कार्यवाही केली.गृहविलगीकरण करण्याची परवानगी न देणेबाबत निर्देश विषयक कामकाज केले.
9) अंबाजोगाई येथील पर्यटनविषयी :-
अंबाजोगाई येथील योगेश्वरी मंदिर ते दासोपंत समाधीपर्यंत सर्वसाधारणपणे एक किलोमीटर रस्त्याबाबत पर्यटन विभांगातर्गत कामकाज करणेबाबत प्रादेशिक व्यवस्थापक,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ औरंगाबाद यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.
तसेच मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अनुषंगाने शिल्प आणि भित्तिचित्रे मध्ये घटनाक्रम मांडून अंबाजोगाई येथे आर्ट गॅलरी तयार करण्याच्या कामकाज उपसंचालक पर्यटन संचालनालय औरंगाबाद यांच्या समवेत सुरू आहे.
10) मराठवाडा मुक्ती संग्राम अंतर्गत कामकाज :-
दि.17 सप्टेंबर 2022 रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरु होत आहे.त्यानिमित्त अपर जिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई यांचे कार्यक्षेत्रातील अंबाजोगाई,केज,धारुर,माजलगाव,
वडवणी,परळी येथील प्रस्तावित कामांचा कृती आराखडा तयार करण्याचे कामकाज चालू आहे.
1. अंबाजोगाई येथील गट नं.622 येथील दासोपंत समाधी परिसरात स्वामी रामानंद तीर्थ यांचे मुक्तीसंग्रामातील काम पाहता त्यांचे छायाचित्रासहित अंबाजोगाई मधील पाच संतांच्या कार्यालचा समावेश करुन एकत्रित स्मृतीस्तंभ बनविणेबाबतच्या संकल्पनेवर काम चालू आहे.
2. जिल्हा परिषद प्रशाला अंबाजोगाई परिसरात असणारा निजामकालीन शहाबुरुज दुरुस्ती व नूतनीकरणाचे कामाबाबत कृतीआराखडयावर कामकाज करित आहोत.


3. श्री.योगेश्वरी मंदिराजवळ पुरातन वस्तुसंग्रहालयासाठी कृतीआराखडयावर कामकाज करत आहोत.
11) एक पुरातन वारसा
संस्कृतीचा ठेवा असणारे शहर आहे दासोपंत यांच्या समाधी कडील जाणाऱ्या रस्त्यालगत प्रेक्षणीय लेण्या आहेत या लेण्यालगत एक ओढा वाहत असून शहरातील सांडपाणी त्यातून वाहत आहे आणि ते पाणी या लेण्यावर पडत असल्याने देण्याचे सौंदर्य बाधित होत आहे या अनुषंगाने पर्यायी मार्ग काढण्याच्या अनुषंगाने कामकाज सुरू आहे.
12) सुंदर माझे कार्यालय :-
1.कार्यालयीन स्वच्छता व अनुषंगीक बाबी :-
कार्यालयातील आंतर्बाहय स्वच्छता कर्मचा-यांचे सहभागाने दररोज करण्यात येते. कार्यालयातील कर्मचा-यांसाठी आकर्षक बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. कर्मचा-यांना ओळखपत्र व जॉबचार्ट पुरविण्यात आली आहेत. कार्यालयात पुरेशी हवा व प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यालयात पुरेशे पंखे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. कार्यालय इमारतीच्या आतील व बाहेरील बाजूस निसर्ग चित्रांचे पेंटींग तसेच भितीवर विविध पक्षांचे फोटो लावून भिंती बोलक्या करण्यात आल्या आहेत.
2.कर्मचारी लाभ विषयक बाबी :-
कर्मचा-यांची सेवापुस्तके अद्ययावत आहेत. सर्व कर्मचा-यांना स्थायित्व लाभ देण्यात आलेले आहे. सर्व कर्मचा-यांची दुय्यम सेवापुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत. सर्व कर्मचा-यांची नामनिर्देशने पूर्ण केली आहेत. सर्व पात्र कर्मचा-यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. भविष्य निर्वाह निधीचे लेखे संगणकीकृत व अद्ययावत आहेत.


13) घनवन लागवड (मियावाकी) व वृक्षलागवड :-
दिनांक 05 जून 2021 रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने इमारतीच्या दक्षिण बाजूस 20 गुंठे क्षेत्रामध्ये मियावाकी पध्दतीने अटल घनवन वृक्ष लागवड अंतर्गत 100 विविध प्रजातींची 6000 रोपे लावण्यात आली आहेत. तसेच इमारत परिसरात सिताफळीच्या 06 प्रजातींची रोपे, गुलाब व कणेरीची रोपे, बांबूची रोपे, औषधी वनस्पती उदा. गवती चहा, कोरफड, अडूळसा, गुळवेल, पिंपळी, शतावरी, आवळा, हिरडा, कडूनिंब, व डाळींब यासारख्या विविध रोपांची लागवड करण्यात आली आहे.तसेच फुल झाडांचे डेन्स फॉरेस्ट करण्यात येऊन यामध्ये सर्वसाधारण एक हजार रोपांची लागवड करण्यात आलेली आहे .एकूण मागील दोन वर्षात या कार्यालयाच्या आवारात जवळपास 15,000 हून जास्त जवळपास 125 प्रजातींच्या रोपांची लागवड, जतन, संवर्धन व देखभाल करण्यात येत आहे. तालुकास्तरावर जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याच्या अनुषंगाने व नदीकाठी 75 km बांबू लागवडीच्या अनुषंगाने कामकाज चालू आहे. शासकीय जमीन व वनविभागाची जमीन यांचा विचार करून या जागेवरही वृक्ष लागवड करण्याच्या अनुषंगाने नियोजन व प्रयत्न सुरू आहेत.