महाराष्ट्र
Sudarshan Rapatwar
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
केज विधानसभा मतदार संघातील सात रस्त्यांची दर्जोन्नती आ. नमिता मुंदडांचा पाठपुरावा सहा रस्त्यांना राज्यमार्गाचा तर एकास जिल्हा मार्गाचा दर्जा. अंबाजोगाई - केज विधानसभा मतदार संघाच्या कर्तव्यतत्पर आमदार नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला आणखी एकदा यश मिळाले आहे. आ. मुंदडा यांच्या प्रयत्नांमुळे मतदार संघातील सात रस्त्यांची दर्जोन्नती करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यापैकी सहा जिल्हा मार्गांना आता राज्य मार्गाचा दर्जा मिळाला असून इतर जिल्हा मार्गातील एका रस्त्यास प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. आ. नमिता मुंदडा यांनी शेकडो कोटी रुपयांचा निधी मतदार संघातील रस्त्यांसाठी आणला असून त्यातून शेकडो किलोमीटरचे दर्जेदार रस्ते तयार झाले आहेत तर काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. आ. मुंदडा यांनी ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी दळणवळण प्रभावी करण्याच्या हेतूने रस्तेनिर्मिती आणि दुरुस्तीकडे विशेष लक्ष दिले. याच हेतूने त्यांनी मतदार संघातील काही रस्त्यांची दर्जोन्नाती करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यास यश आले असून मतदार संघातील सात रस्त्यांची दर्जोन्नती झाली आहे. त्यानुसार २०९ किलोमीटर लांबीच्या सहा जिल्हा मार्गांना राज्य मार्गाचा तर इतर जिल्हा मार्गातील ९ किमीच्या एका रस्त्यास प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे रुंदी वाढून रस्ते प्रशस्त होणार असल्याने वाढत्या वाहतुकीसाठी सोयीचे ठरणार आहे. त्यासोबतच वेळोवेळी या रस्त्यांच्या दुरुस्तीकामाच्याही निविदा निघणार असल्याने नागरिकांना कायमस्वरूपी दर्जेदार रस्ते उपलब्ध होऊ शकणार आहेत. रस्त्यांची दर्जावाढ केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, लोकनेत्या आ. पंकजाताई मुंडे, भाजप नेत्या प्रीतमताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत. *राज्यमार्गाचा दर्जा मिळालेले रस्ते -* प्रजिमा-५२ बोधेगाव ते राक्षसवाडी- भावठाणा- धावडी डोंगरपिंपळा- चनई ते रा.मा. २११ मोरेवाडी ते रामा-५६ ते राममा ५४८ 'डी' ते अंबाजोगाई गीत्ता- जवळगाव रामा- २२१ ते लिंबगाव- हातोला ते प्रजिमा-५७ रस्ता (एकूण २५.१० किमी), प्रजिमा-१८ ते धनेगाव- नायगाव- सौंदना ईस्थळ- आपेगाव- देवळा- धानोरा (बु) रस्ता (एकूण २१ किमी), राममा- ६१ ते खरात आडगाव ते टाकळी- आनंदगाव- राममा-३६१ दिंद्रुड- आडस- होळ- राममा- ५४८ 'डी' ते बोरीसावरगाव- ईस्थळ प्रजीमा-४५ जिल्हा सरहद रस्ता (एकूण ५० किमी), प्रजिमा-७६ देवगाव- विडा- शिंदी फाटा ते येवता- कोळवाडी- तरणळी ते राममा-५४८ "सी" रस्ता (एकूण २५.४ किमी), राममा-२३२ चिखलबीड- जिवाचीवाडी- लव्हरी कानडीमाळी- केज राममा ५४८ 'डी' ते सोनीजवळा- आनंदगाव- पैठण रामा-६४ रस्ता (एकूण ४९ किमी), राममा- २२२ से दहिफळ (वड)- देवगाव राममा-५४८ 'डी' ते रामा-६४ शिरूरघाट ते पिट्टीघाट ते प्रजिमा- ४० जिल्हा सरहद रस्ता (एकूण ३९.४ किमी) *जिल्हामार्गाचा दर्जा मिळालेले रस्ते -* नाश्रा- इंजेगाव से राममा ५४८ 'बी' ते देशमुख टाकळी पांगरी नागापूर- साकुड- अंबाजोगाई ते रामा-२३५ रस्ता (एकूण ९ किमी)
Related Articles
Check Also
Close