महाराष्ट्र
केज मतदारसंघातील महिलावर्गांची आ. नमिता मुंदडा यांनाच पसंती !
हजारो महिला, युवती आ. नमिता मुंदडा यांच्या सोबत प्रचारात सक्रिय
केज विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जसजशी जवळ येते आहे तसतसा मतदार संघातील महिला आणि युवती वर्गाचा पाठिंबा आ. नमिता मुंदडा यांना वाढत चालला आहे. गेली अनेक वर्षांपासून मतदारसंघातील रखडलेले रस्त्यांचा प्रश्न, पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न, आरोग्य सुविधेत होत असलेली वाढ ही पुढील काळात महिलांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आ. नमिता मुंदडा यांचे असलेले व्हिजन या कारणांमुळे मतदारसंघातील महिला आणि युवती या आ. नमिता मुंदडा यांच्या पाठिशी नुसत्याच उभ्या नाहीत तर त्या त्यांच्या सोबत प्रचार यंत्रणेत ही सक्रिय झाल्याचे दिसून येते आहे.
“नातं विकासाचं, काम विश्वासाचं” हे ब्रिद घेवून माजी आ.नमिताताई मुंदडा यांनी मागील पाच वर्षात केलेलं विकास काम यामुळे त्यांचा जनमाणसामध्ये विकासप्रिय आमदार असा ठसा उमटला आहे. सध्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंदडा यांना जनतेचा दिवसेंदिवस पाठींबा वाढत आहे. विविध समाज घटक नमिताताईंच्या विजयासाठी सरसावले आहेत. मंगळवारी सायंकाळी शहरातील लाल नगर भागात शेकडो महिला, युवती आणि नागरिकांनी आ. नमिता मुंदडा यांना सक्रिय पाठींबा दर्शवत विजयासाठी आशिर्वाद दिले.
अंबाजोगाई शहरातील लालनगर येथे महिला-भगिनी यांनी आयोजित केलेल्या संवाद बैठकीस आ.नमिता मुंदडा या उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित सर्वांशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. तसेच होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत माझ्या पाठीशी राहत मला मतदानरुपी आशीर्वाद द्यावेत, अशी नम्र विनंती केली. या प्रसंगी मतदार बंधू-भगिनी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. नातं विकासाचं काम विश्वासाचं हे ब्रिद घेवून आपण मागील पाच वर्षे काम केलं आहे. त्याची पावती जनता आशिर्वाद रूपाने देणार आहे.
आपण धनेगाव धरणातून अंबाजोगाई शहराला होणार्या पाणीपुरवठा योजनेचे अधिक विस्तार करण्यासाठी 206 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून या योजनेचे प्रत्यक्ष काम प्रगतीपथावर आहे. ही योजना प्रत्यक्ष कार्यरत झाल्यानंतर, अंबाजोगाई शहरातील नागरिकांची पाणीटंचाई पासून कायमची सुटका होणार आहे. अंबाजोगाई शहराच्या पाणीपुरवठा योजना विस्तारीकरणाची माहिती देणारी संक्षिप्त चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/11/img_20241115_1356428130524279903021520.jpg)