बाबुराव पोटभरे, हरुणभाई इनामदार, राजेश वाव्हळे बब्रुवान पोटभरे यांची भुमिका
केज विधानसभा मतदारसंघातील एकाधिकारशाही संपवण्यासाठी बहुजन विकास मोर्चा ने पृथ्वीराज साठे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे अशी भुमिका बाबुराव पोटभरे यांनी पत्रपरिषदेत मांडली.
शहरातील पियुष इन हॉटेल मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रपरीषदेत बाबुराव पोटभरे, हारुणभाई इनामदार, राजेश वाव्हळे, बब्रुवान पोटभरे यांनी आपली भुमिका जाहीर केली.
यावेळी विस्ताराने बोलतांना बाबुराव पोटभरे पुढे म्हणाले की, केज विधानसभा मतदारसंघावर मागील पंचेवीस वर्षांपासून मुंदडा परिवाराचे वर्चस्व आहे. पंचेवीसवर्षे सत्तेत असल्यामुळे या परिवाराची या मतदारसंघात एकाधिकारशाही निर्माण झाली आहे. मागील पाच वर्षांत या मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली गेली मात्र यातील अनेक कामे ही फक्त कागदोपत्रीच आहेत, या कामाची चौकशी व्हायला हवी.
केज विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आता कोण्या पुढा-याची राहिली नाही तर ती सर्वसामान्य जनतेची झाली असून सर्वसामान्य जनता ही गरीब कुटुंबातुन पुढे येऊ पहाणारा व विकासकामांची जाण असलेल्या पृथ्वीराज साठे यांच्या मागे उभी असून या सर्वसामान्य जनतेसोबत या निवडणुकीत उभे राहण्याची भुमिका बहुजन विकास मोर्चाने घेतली असून या निवडणुकीत पृथ्वीराज साठे हे ५० हजार मतांनी विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या पत्रपरीषदेत केज शहरातील जनविकास आघाडीचे प्रमुख हारुण इनामदार, लोकजन शक्ती चे राजेश वाव्हळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजकिशोर मोदी, माकप चे कॉ. बब्रुवान पोटभरे, विनोद शिंदे यांनी आपली भुमिका सांगत आपण ही सर्व ताकदीनिशी पृथ्वीराज साठे यांच्या पाठीमागे उभे असल्याचे सांगितले.
या पत्रपरीषदेचे प्रास्ताविक डॉक्टर सेल चे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी केले. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजकिशोर मोदी, युवा नेते बबन लोमटे, केज येथील जनविकास आघाडीचे हारून इनामदार, मा क प चे कॉ बब्रुवान पोटभरे, प्रहार संघटनेचे अशोक गंडले, विनोद शिंदे, राजेश वाव्हळे, महादेव आदमाने यांच्या सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.