राष्ट्रीय

प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे मोठं षडयंत्र; पुनम महाजन यांचे वक्तव्य

१८ वर्षांनंतर हत्येसंदर्भात केले मोठे विधान

प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे मोठं षडयंत्र असल्याचीच शक्यता असलेले महत्वाचे वक्तव्य त्यांची कन्या माजी खासदार पुनम महाजन यांनी केले आहे. पुनम महाजन यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

२० नोव्हेंबर रोजी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वात अग्रणी असलेल्या एबीपी माझा या दुरचित्र वाहिणीने घेतलेल्या सविस्तर मुलाखतीत पुनम महाजन यांनी हे वक्तव्य सर्वप्रथम केले होते. त्यानंतर अनेक माध्यमांनी पुनम महाजन यांच्या मुलाखती प्रसारीत केल्या या सर्व मुलाखतीत त्या या वक्तव्यावर ठामपणे बोलल्या.

यावर अधिक भाष्य करतांना त्या म्हणाल्या की, प्रमोद महाजन यांच्या वर त्यांच्याच पिस्तुलातून प्रविण महाजन यांनी गोळ्या झाडल्या हे सत्य असले तरी प्रविण महाजन याच्या हातातुन प्रमोद महाजन यांच्याच पिस्तुलातून गोळ्या झाडून घेणारी शक्ती मात्र वेगळीच आहे असा दावा त्यांनी केला आहे.

प्रविण महाजन याने एका दिवसात किंवा काही क्षणात प्रमोद महाजन यांच्या वर गोळ्या झाडल्या हे खरे असले तरी हे कृत्य प्रविण यांच्याकडून करुन घेण्यासाठी अनेक दिवसांपासून त्याच्या मागे ही शक्ती कार्यरत असावी असा आपला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रमोद महाजन यांच्या हत्येला आज १८ वर्षे पुर्ण झाली आहेत. प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर आपले अनेक वर्षे आपले कुटुंब सावरण्याचा गेले गेले. या कठीण परिस्थितीतुन आपण कसेबसे सावल्या नंतर आपण तत्कालीन गृहमंत्री आणि संबंधित पोलिस अधिकाऱ्यांकडे याबाबत प्रश्न उपस्थित केले, मात्र या बाबतच्या तपासाला गती आली नाही.

आता या विधानसभा निवडणुकीनंतर आपण प्रमोद महाजन यांच्या हत्येमागील खरे सुत्रधार कोण आहेत याचा शोध घेण्याइतकी विनंती करणारे पत्र गृहमंत्र्यांची भेट घेऊन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर आपण या विषयावर अनेक लोकांशी बोललो, अनेक शक्यता पडताळून पाहिल्या आणि या हत्येमागील खरा सुत्रधार हा प्रविण नसुन इतर कोणतीतरी अदृश्य शक्ती आहे जी प्रमोद महाजन यांना त्यांच्या जागेवरुन हटवू शकत होती ती असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत असे त्यांनी सांगितले. आपण या अदृश्य शक्ती पर्यंत पोहोचू शकत नाही. पोलीसांच्या तपासाच्या वेगवेगळ्या दिशा असतात. त्यांना अनेक शंकांच्या माध्यमातून तपास करता येईल, अनेक शक्यता पडताळून पहाता येतील. पोलिसांच्या या तपासात आपण. संपुर्ण सहकार्य करु असे त्यांनी सांगितले आहे.
विधानसभा निवडणुकीपुर्वी पुनम महाजन यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांमुळे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रमोद महाजन यांच्या हत्येसंदर्भात अनेक नवे प्रश्न निर्माण केले आहेत.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker