या भेटी मागे नेमकं दडलंय काय?
राष्ट्रवादीवर नाराज असलेल्या अंजली घाडगे आ. नमिता मुंदडा यांना पाठिंबा देणार का?
केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीची धामधुम सुरु असतांनाच आपल्या प्रचाराच्या वस्ततेतून वेळ काढून आ. नमिता मुंदडा यांनी या निवडणुकीच्या सुरुवातीच्या उमेदवारी मिळवण्याच्या कालावधीत प्रबळ दावेदार अंजली घाडगे यांची भेट घेऊन त्यांना आवर्जून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या सदिच्छा भेटी मागे दडलंय काय? राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेवर नाराज असलेल्या अंजली घाडगे या नमिता मुंदडा घ्या सोबत जाणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
उमेदवारी दिली नाही?
केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीच्या सुरुवातीच्या कालावधी मध्ये अंजली घाडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी तनमनधनाने प्रयत्न केले. पक्षाच्या सुचनेप्रमाणे त्यांनी सर्वात अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश ही केला. पण राष्ट्रवादी काँग्रेस ने त्यांना डावलून पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी जाहीर केली.
प्रा. सौ. संगीता ठोंबरे उपाध्यक्ष झाल्या
उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे त्या निवडणूक रिंगणातुन बाहेर पडल्या. त्यांच्या सहप्रतिस्पर्धी प्रा. सौ. संगीता ठोंबरे यांनी उमेदवारी अर्ज भरला, मागे ही घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांना पाठिंबा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या त्या उपाध्यक्ष ही झाल्या.
प्रचार यंत्रणेत डावलले जात असल्याचा आरोप
या सर्व घडामोडीत अंजली घाडगे या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सर्व प्रक्रियेतून बाहेर फेकल्या गेल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांची प्रचार यंत्रणा हाताळणा-या लोकांना अंजली घाडगे यांचा विसर पडला. मधल्या काळात त्या पृथ्वीराज साठे यांच्या प्रचाराचा ना नारळ फोडताना दिसल्या ना प्रचार यंत्रणेत कुठे ही सहभागी होतांना दिसल्या. त्या एकाकी पडल्याचे दिसून येत होते.
समाज माध्यमांवरुनही होत्या गायब?
मध्यंतरी समाज माध्यमांवरुन न दिसणाऱ्या अंजली घाडगे या आज अचानक दिसल्या त्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार आ. सौ. नमिति मुंदडा यांच्या सोबत. आ. सौ. नमिता मुंदडा यांनी अंजली घाडगे यांची वाढदिवसाच्या निमित्ताने भेट देवून त्यांना उत्तम आरोग्य आणि राजकीय स्थैर्यासाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीमध्ये आ. नमिता मुंदडा आणि अंजली घाडगे यांच्या मध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचे ही सांगण्यात येते.
निवडणुकीवर चर्चा झालीच असणार!
वेळ निवडणुकीची आणि राजकारणात रस असणा-या दोन व्यक्तींची निवडणुकीवर चर्चा होणार नाही असे कसे होईल? निवडणुक संदर्भात चर्चा झालीच आसणार! नेमकी ही चर्चा काय झाली? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नाराज असलेल्या अंजली घाडगे या निवडणुकीत आ. नमिता मुंदडा यांच्या सोबत जाणार का? नेमकी काय भुमिका अंजली घाडगे यापुढे घेणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच आपल्या मिळतील अशी अपेक्षा आहे.