ज्यांच्या नेत्यांनीच लग्न झालेली नाहीत ते काय तुमची लग्न लावून देणार असा पलटवार आ. धनंजय मुंडे यांनी राठी येथील प्रचारसभेत बोलताना केला.
परळी विधानसभा निवडणुकीत आपल्याला निवडुन द्यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी लग्नाच्या मुद्दाचा फंडा वापरला होता. मतदार संघातील तरुण अविवाहित मुलांनी आपल्याला निवडून द्यावे, आपण त्यांची लग्ने करुन देतो असे ते म्हणाले होते.
आपले प्रतिस्पर्धी राजेसाहेब देशमुख यांनी केलेल्या या वक्तव्यावर ना. धनंजय मुंडे यांनी पलटवार करतांना ज्यांच्या नेत्यांनीच लग्न झालेली नाहीत ते काय तुमची लग्न लावून देणार असे म्हटले आहे.
आपल्या विस्तारीत भाषणात ना. धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, मी आजपर्यंतच्या राजकारणात कधीही जातीपातीचे, गटातटाचे राजकारण केले नाही. निवडणुकी पुरतेच मी राजकारण करतो. एकदा निवडणूक संपली की माझ्याकडे येणा-या प्रत्येक माणसाचं काम प्रामाणिकपणे करण्याचा मी प्रयत्न करतो आहे.
मागील लोकसभा निवडणुकीपासून निवडणुकीचे तंत्र बदलले आहे असल्याचे दिसते.. विकासाच्या मुद्द्यावर होणारी निवडणूक जातीपातीच्या राजकारणात गुरफटल्याचे जाणवते. यामुळे विकासाला खीळ बसते. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या तर त्या केंद्रात मंत्री झाल्या असत्या आणि बीड जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली असती. चुकीचा उमेदवार निवडून गेला की सामान्य माणसासोबत मतदार संघाचे ही मोठे नुकसान होते. म्हणून या निवडणुकीत जातीपातीच्या राजकारणात अडकून पडू नका. मोठ्या मनाने व उत्साहाने या निवडणुक उत्सवात सहभागी व्हा व घड्याळ या चिन्हावर मुलीचे बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.