महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीनंतर संजय दौंड यांच्यावर पक्ष देणार मोठी जबाबदारी ; ना. धनंजय मुंडे

कार्यकर्त्यांनी कामाला लागावे;

संजय दौंड यांचे आवाहन

विधानसभा निवडणुकीनंतर माजी आमदार संजय दौंड यांच्यावर पक्ष मोठी जबाबदारी देणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी पत्रपरिषदेत दिली. तर कार्यकर्त्यांनी ना. धनंजय मुंडे यांना विजय मिळवून देण्यासाठी आपण आपसातील मतभेद विसरून कामाला लागावे असे आवाहन विधान परिषदेचे माजी सदस्य संजय दौंड यांनी केले.
परळी विधानसभा मतदारसंघ विधानसभा निवडणुकीपुर्वी संजय दौंड आणि ना. धनंजय मुंडे यांच्या मध्ये मतभेद असल्याच्या बातम्या संजय दौंड यांनी आयोजित करण्यात आलेल्या संवाद बैठकीनंतर समाज माध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर या संदर्भात खुलासा करण्यासाठी संजय दौंड यांच्या फार्म हाऊसवर आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रपरीषदेत संजय दौंड आणि ना. धनंजय मुंडे यांनी आपली मत व्यक्त करतांना हा खुलासा केला.या संदर्भात अधिक विस्ताराने बोलतांना कृषी मंत्री धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, संजयभाऊ दौंड यांनी आयोजित केलेल्या संवाद बैठकी नंतर मधल्या काळात वेगवेगळ्या अफवा काही गोष्टीच्या संदर्भात समाज माध्यमांवर आणि वृत्तपत्रातून बातम्या आल्या. संजय दौंड यांनी या संदर्भात आपली भूमिका दोन दिवसांत स्पष्ट करु असे यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले होते, याप्रमाणे आज त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे . संजयभाऊ परळी विधानसभा मतदार संघात गेली अनेक वर्षांपासून लोकांच्या समस्या, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी गेली अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. त्याच प्रमाणे पंकजा ताई मुंडे यांनी ही या मतदारसंघात काम केले आहे. राजकारणाच्या प्रारंभीच्या काळात संजय दौंड आणि माझ्यामध्ये टोकाचे मतभेद होते, अनेकवेळा आमच्या मध्ये राजकीय संघर्ष झालेला ही आपण पाहीले आहे. मात्र २०१९ च्या निवडणुकीपासून संजय दौंड आणि मी एकाच पक्षात एकत्र मिळून काम करीत आहोत. संजय दौंड यांच्याच प्रयत्नामुळे मी त्या निवडणुकीत विजयी झालो यांची मला जाणीव आहे. याही पुर्वी २०१४ पासून आम्ही एकमेकांसोबत एकरुप होवून एकदिलाने काम करतो आहोत. आमच्या मध्ये समज गैरसमज कधीच झाले नव्हते. एवढेच नव्हे तर आमचे बोलणे ही कधीच बंद नव्हते. समज गैरसमज होते ते कार्यकर्त्यांच्या गटागटात होते. ते गैरसमज दुर करण्यासाठी आम्ही दोघांच्या सहमतीनेच संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संवाद बैठकी त्यांनी कार्यकर्त्यांचे गा-हाणे एकुण घेतले आणि कार्यकर्त्यांना सांगितल्या प्रमाणे त्यांनी आज दोन दिवसानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
या दोन दिवसांत त्यांनी कार्यकर्त्यांतील समज गैरसमज दुर करण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले आहेत. संजयभाऊ दौंड यांचे माझे , आमच्या पक्षश्रेष्ठींशी बोलणे झाले आहे आणि आता परळी विधानसभा निवडणुकीची जबाबदारी संजयभाऊ दौंड यांच्यावर टाकण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. या विधानसभा निवडणुकीनंतर
संजयभाऊ दौंड यांच्या वर पक्ष मोठी जबाबदारी ही देणार आहे. तेंव्हा कार्यकर्त्यांनी आणि समाज माध्यम प्रतिनिधींनींही यापूर्वी झालेली मागील सर्व चर्चेला पूर्णविराम द्यावा. पक्षातील सहका-यांनी आप आपसातील मतभेद विसरून कामाला लागावे असे आवाहन ना. धनंजय मुंडे यांनी केले.प्रारंभी संजय दौंड यांनी संवाद मेळावा आयोजित करण्यामागील आपली व कार्यकर्त्यांची भुमिका स्पष्ट केली. २०१९९ घ्या विधानसभा निवडणुकीपुर्वी आपण ना. धनंजय मुंडे यांच्या प्रचाराची जबाबदारी घेतली आणि त्यांना निवडून आणले. तेंव्हापासून आज पर्यंत आमच्या दोघांमध्ये कसलेही मतभेद नाहीत, नव्हते. गेली पाच वर्षे आम्ही दोघांनी भावाप्रमाणे खांद्याला खांदा लावून काम केले. काम करताना गावागावातील कार्यकर्त्यांत थोडे मतभेद होते, त्यामुळे मागील दोन दिवसांपूर्वी संवाद बैठकीचे आयोजन केले होते व कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकून घेतले होते. या संवाद बैठकीनंतर ना. धनंजय मुंडे यांच्या शी सविस्तर चर्चा केल्यानंतर पुन्हा परत त्यांच्या विजयासाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेस (अपा) गटाचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकात
आ. धनंजय मुंडे आणि माजी आमदार संजय दौंड यांच्या बद्दलच्या संभ्रमावर पडदा पाडण्यासाठी व खरी वस्तुस्थिती माध्यमांसमोर सांगण्यासाठी या पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. युतीच्या सर्व कार्यकर्त्यांत कसल्याही प्रकारचा संभ्रम ठेवे नये असे सांगत ना. धनंजय मुंडे हे राज्याचे स्टार प्रचारक असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार आणि मित्र पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याची त्यांचेवर मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी माजी आमदार संजय दौंड यांच्यावर परळी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पक्षाने सोपवली आहे. उद्या पासून संजय दौंड हे परळी विधानसभा मतदारसंघाची प्रचार धुरा सांभाळणार असून ना. धनंजय मुंडे यांना महाराष्ट्रात विधानसभा प्रचाराच्या रणधुमाळीत सहभागासाठी मोकळे सोडणार आहेत.संजयभाऊ दौंड व ना. धनंजय मुंडे यांच्या मध्ये कसलेही मतभेद नव्हते आणि यापुढेही राहणार नाहीत. तेंव्हा कार्यकर्त्यांनी आप आपसातील समज गैरसमज दुर करुन परळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ना. धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
या पत्रपरिषदेस राष्ट्रवादी काँग्रेस (अपा) गटाचे नेते दत्तात्रय (आबा) पाटील, परळी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष गोविंद देशमुख, तालुका अध्यक्ष राजाभाऊ औताडे, रणजित लोमटे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker