खा. डॉ. अजित गोपछडे १० मार्च रोजी अंबाजोगाईत; विविध कार्यक्रमांचे आयोजन


भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित खा. डॉ. अजित गोपछडे हे १० मार्च रोजी अंबाजोगाई येथे येत असून आ. नमिता मुंदडा यांच्या हस्ते विशेष सत्कार व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्षाचे वतीने राज्याचे उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे यांची राज्यसभेवर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. सदरील नियुक्ती नंतर खा. डॉ. अजित गोपछडे हे रविवार १० मार्च रोजी प्रथमच अंबाजोगाई येथे येत आहेत.
या निमित्ताने सकाळी ९ वाजता ते आ. नमिता मुंदडा यांच्या निवासस्थानी येणार असून याच वेळी सकाळी ९:३० वाजता भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आ. नमिता मुंदडा यांच्या हस्ते खा. डॉ. अजित गोपछडे या़चा सत्कार करण्यात येणार आहे. या सत्कारानंतर ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या नंतर सकाळी १० वाजता खा. डॉ. अजित गोपछडे हे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयास भेट देणार असून यावेळी परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय महाविद्यालयाच्या सभागृहात महाविद्यालयाच्या सर्व डॉक्टर्सच्या वतीने व शहरातील इ़डियन मेडिकल असोसिएशन, अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन च्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.
सकाळी ११ वाजता शहरातील शंभुलिंग शिवाचार्य मठात लिंगायत समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार असून यावेळी समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन ते स्विकारणार असून समाजाला ते मार्गदर्शन करणार आहेत.
या सर्व कार्यक्रमांस भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पक्षांतर्गत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.