राजर्षी शाहू पतसंस्थेच्या ३९ लाख लुट प्रकरणी १ गजाआड; ९ लाख हस्तगत


स्थानिक गुन्हा शाखा बीड पोलिसांची कारवाई
अंबासाखर येथील राजश्री शाहु नागरी सहकारी पतसंस्थेची रक्कम घेवून जाणाऱ्या कॅशयरला एका अज्ञात टोळीने लुटत ३९ लाख १६ हजार १६० रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास केली होती. ही घटना १६ फेब्रुवारी रोजी घडली होती. यातील एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करून त्याच्याकडून ९ लाखांची रोकड हस्तगत केली आहे. अद्याप तीन फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
१६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ नंतर गणेश सुभाषराव देशमुख व योगेश लोभेकर हे राजश्री शाहू नागरीसह पतसंस्थेची दिवसभर जमा झालेली रोकड ३९ लाख – १६ हजार १६० रुपये बॅगमधून घेऊन जात असताना मुकुंदराज कॉलनी नवा मोंढा रोड येथे तीन अनोळखी इसम यांच्या बॅगमधून सर्व रोकड घेऊन पळ काढला. याप्रकरणात अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात १७ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांना नारायण शाहसव जोगदंड (रा. अंबा. कारखाना जि. बीड) व त्याच्या तीन साथीदाराबाबत माहिती मिळाली होती. या घटनेत यांचा हात होता. त्यानुसार साबळे यांनी आरोपी शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्या पथकास मार्गदर्शन करुन रवाना केले.
९ लाख रुपये पोलीसांनी केले हस्तगत
अंबासाखर कारखाना परिसरात आरोपीचा शोध घेतला असता नारायण जोगदंड हा त्याचे अंबासाखर कारखाना वाघाळा वसाहतीत घरी – मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन गुन्ह्यात संदर्भात बारबाईने विचारपुस केली असता त्याने त्याचे इतर तीन साथीदार अशांनी बँकेचे पैसे लुटण्याचा प्लान करुन पैसे घेवुन निघताच मोबाईल वरुन सांगण्याचे व मिळालेली रक्कम आपसात वाटून घेण्याचे ठरवले होते. त्यावरुन उक्त नमुद आरोपीने त्याचे इतर साथीदारांना सदरची टिप देवून बँकेचे पैसे लुटीचा गुन्हा केला आहे. त्यावरुन सदर आरोपीचे ताब्यातुन गुन्हयांतील त्याचे हिश्शाला आलेली ९,००,०००/- रु ची रक्कम जप्त करण्यात आलेली आहे.
१ गजाआड; दोघांचा शोध सुरु
आरोपी नामे नारायण शाहुराव जोगदंड वय २७ वर्षे रा. अंबा. सहकारी साखर कारखाना वाघाळा ता. अंबाजोगाई यास पुढील कारवाई कामी पो. ठा. अंबाजोगाई शहर यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. उर्वरित तीन निष्पन्न फरार आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखा, बीड शोध घेत आहे.
बीड स्थानिक गुन्हे शाखा विभागाची कारवाई
सदरची कामगिरी पोलीस -निरीक्षक श्री. संतोष साबळे, पोउपनि श्रीराम खटावकर, पोह/मनोज – वाघ, प्रसाद कदम, पोना/विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, – सचिन आंधळे, देविदास जमदाडे, गणेश हांगे, अश्विनकुमार सुरवसे,- – नारायण कोरडे, चालक/सुनिल राठोड सर्व नेम. स्थानिक गुन्हे – शाखा, बीड यांनी केलेली आहे.