बर्दापुर जवळील जळीत कार प्रकरणाचा पोलीस तपास अडखळला…!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/12/IMG_20231221_171356-1024x594.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/12/IMG_20231221_171356-1024x594.jpg)
आगीत झाला होता अज्ञात इसमाचा जळून मृत्यू
अंबाजोगाई लातुर राज्य रस्त्यावरील बर्दापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाचपीर दर्गा जवळ झालेल्या कार जळीत प्रकरणाचा तपास २४ तास होत आले तरी अजूनही अडखळलेलाच दिसतो आहे. या कार मध्ये एका अज्ञात इसमाचा जळून मृत्यू झाला असल्यामुळे या प्रकरणी या परीसरात उलटसुलट चर्चा ऐकावयास मिळत आहेत.
अंबाजोगाई-लातुर राज्य रस्त्यावर कारला अचानक लागलेल्या आगीत चालका शेजारी बसलेल्या सीटवरच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना बर्दापूर येथील पेट्रोल पंपा जवळ राष्ट्रीय मार्गावर काल २० डिसेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली होती.
२० डिसेंबर ची घटना; कार मालक लातुराचा!
सदरील कारचा मालक लातूर येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी एम.एच.०८ आर ७८७९ या क्रमांकाची कार सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास लातूर कडे निघाली होती. तालुक्यातील बर्दापूर जवळ पेट्रोल पंपा नजीक राष्ट्रीय महामार्गावर सदरील कारने अचानक पेट घेतला. आगीमध्ये ही कार संपूर्णपणे जळून खाक झाली . घटनेची माहिती मिळतच बर्दापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. दरम्यान त्या ठिकाणी कार मध्ये चालकाच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीचा आगीत जळून मृत्यू झाल्याचे आढळून आले. कारचा चालक व इतर कारमधील प्रवाशी त्या ठिकाणी नव्हते. आग कशी लागली हे अद्याप स्पष्ट नसून अन्य महत्त्वाची माहिती बर्दापूर पोलीस घेत आहेत.
कार मालकाचा फोन येतोय बंद!
बर्दापुर पोलीसांनी या प्रकरणी गुगलवर सर्च करुन व प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिका-यांशी संपर्क साधुन सदरील कार मालकाच्या मोबाईल क्रमांकावर फोन लावला असता सदरील फोन बंद येत आहे. सदरील फोन हा मयत व्यक्तीच्या सोबतच जळुन गेला का याचा ही तपास पोलीस करीत आहेत.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/12/IMG_20231221_171635-300x137.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/12/IMG_20231221_171635-300x137.jpg)
स्पॉट पंचनामा अभावी शवविच्छेदन लांबले!
सदरील कार मध्ये जळुन खाक झालेल्या व्यक्तीचे अर्धवट जळालेली हाडे असलेले पार्थिव बर्दापुर पोलिसांनी २० डिसेंबर रोजीच येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवविच्छेदन विभागात पोत्यात बांधुन आणले होते. सदरील पार्थिव कोल्ड स्टोरी मध्ये ठेवण्यात आले आहे. शवविच्छेदन करण्यापुर्वी पोलीस व वैद्यकीय अधिकारी यांच्या समक्ष मृतदेहाचा स्पॉट पंचनामा करण्यात येवून त्या नंतर संबंधित तज्ञ डॉक्टर शवविच्छेदन तपासणी करून शवविच्छेदन अहवाल तयार करतात. मात्र संबंधित पोलिस अधिकारी या प्रक्रियेसाठी शवविच्छेदन विभागात अद्दाप पर्यंत न आल्याने शवविच्छेदन अद्दाप ही झाले नसल्याची माहिती मिळते आहे.
शवविच्छेदन करणा-या डॉक्टरांची टीमने घटनास्थळाला दिली भेट!
सदरील अज्ञात मयत व्यक्तीचे पार्थिव शवविच्छेदनासाठी आणण्यात आले त्यावेळी त्या संपुर्ण शरीरातील फक्त महत्वाच्या हाडाचा सापळाच शिल्लक होता. यावरुन सदरील व्यक्ती ही मेल आहे की फिमेल हे लक्षात येत नसुन त्याच्या शरीरातील इतर बारीक हाडे ही गाडीत जळुन पडलेली आढळून आल्यामुळे या विभागातील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची एका टीमने तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासाचा व तपासाचा एक भाग म्हणून भेट दिल्याची माहिती मिळाली आहे.
२४ तास झाले तरी तपास जैसा थे…!
या प्रकरणी पोलीस तपासाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तपासी पोलीस अधिकारी बर्दापुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महिंद्रसिंह ठाकुर यांचेशी दुरध्वनी वरुन संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी अद्याप ही अधिक माहिती पोलिसांच्या हाती लागली नसल्याचे सांगितले. हे प्रकरण गंभीर असून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच त्या संबंधीची माहिती दिली जाईल असे त्यांनी माध्यमांना सांगितले.