अंबाजोगाईचा अभिनव अरुण पत्की युपीएससीच्या आ.ई.एस. परीक्षेत भारतात १४ वा


अंबाजोगाई अभिनव अरुणराव पत्की याने आज जाहीर झालेल्या युपीएससीच्या इंडीयन इंजिनिअरिंग सर्व्हिस या परीक्षेत भारतात १४ वा क्रमांक( रँक ) पटकावला आहे. कुठल्याही क्लास ला न जाता सेल्फ स्टडीच्या माध्यमातून अभिनव याने हे यश संपादन केले आहे.
अभिनव पत्की याचे शालेय शिक्षण येथील श्री.खोलेश्वर विद्यालयात झाले. इयत्ता १२ वी च्या विज्ञान शाखेत उत्तीर्ण झाल्यानंतर तो वालचंद अभियांत्रिकी महावद्यालय सांगली येथून सिव्हिल इंजिनिअर ची पदवी प्राप्त करून अभियंता झाला. व टी.सी.ई.कंपनीत त्याने नौकरी ही केली.मात्र त्याच्या मनातील प्रशासकीय अधिकारी होण्याची जिद्द कांहीं त्याला स्वस्थ बसू देईना.त्याने नौकरी करत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरूच ठेवला. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत असणाऱ्या संचारबंदीत त्याने आपला सर्व वेळ अभ्यासात घालविला. त्याने दोन वेळा युपीएससीच्या परीक्षा दिल्या.पहिल्या वेळी थोडक्यात यश हुकले.मात्र दुसऱ्या झालेल्या युपीएससीच्या इंडीयन इंजिनिअरिंग सर्व्हिस या परीक्षेत भारतात १४ वा क्रमांक पटकावला आहे.


अभिनव हा येथील श्री.खोलेश्वर विद्यालयातील पर्यवेक्षक अरुण पत्की व सौ. पत्की यांचा सुपुत्र आहे.
अंगी जिद्द व चिकाटी असल्यास यश मिळतेच – अभिनव पत्की