महाराष्ट्र

स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयास यंत्रसामुग्री खरेदीसाठी १ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी मंजूर

आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश


अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील रुग्णसेवा अधिक सक्षम करणे व राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने सुचविलेल्या मानकाची पुर्तता करण्यासाठी १ कोटी ३९ लक्ष रुपयांच्या यंत्रसामुग्री खरेदीस राज्यशासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात गेली अनेक वर्षांपासून विविध विभागांतील यंत्रसामग्रीचा सतत तुटवडा जाणवत होता. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५० वरुन २०० वर गेल्यानंतर या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत ही मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्ण सेवा सक्षम करणे व आवश्यक असलेली यंत्रसामग्री रुग्णालयास पुरवणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. राज्यशासन ही जबाबदारी व्यवस्थितरित्या पुर्ण करीत नसेल तर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग त्या संबंधीच्या त्रुटी काढून त्या राज्य शासनास पुर्ण करण्यास सांगत असतो.


या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात गेली अनेक वर्षांपासून विविध विभागांत यंत्रसामुग्रीचा सततचा तुटवडा जाणवत होता. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने काढलेल्या त्रुटी भरुन काढण्यासाठी या विभागाच्या आ. नमिता मुंदडा या सातत्याने राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडे पाठपुरावा करीत होत्या. त्यांच्या पाठपुराव्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयास राज्यशासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने १ कोटी ३९ लक्ष ५ हजार ५०० रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे.


या निधीतून वैद्यकीय महाविद्यालयात
इअर इंनस्टुमेंट सेट (मिडियम एन्ड),
मायक्रोसर्जरी इंनस्टुमेंट सेट,
एंडोस्कोप (हाय एन्ड), मल्टीपरा मॉनिटर (हाय एन्ड), आरव्हीजी विथ डेस्कटॉप संगणक, एन एस टी मशीन,
सक्शन मशीन, ओ.टी. लाईट, ओ.टी. टेबल, सिरिंज पंप, रेसेक्टोस्कोप,
वर्टिकल ऑटोक्लेव्ह, एलिसा वॉशर एन्ड रिडर, ड्युअल पॅन बॅलन्स, ब्लड कलेक्शन, प्लेटलेट एजीटेटर एन्, प्लेटलेट इनक्यूबेटर, मॅन्युअल प्लाझ्मा एक्सप्रेसर, पोर्टेबल ट्यूब सीलर, बेंच टॉप ट्यूब सीलर, डोनर काउच, प्लाइमा बाथ, सेंट्रीफ्यूज मशीन, इलेक्ट्रॉनिक्स मल्टीचॅनल,पिपेट-३००-१२००ul, बीपी ऍपेरेटस,ब्लड बॅग वेइंग मशीन, डेस्कटॉप संगणक हाय एन्ड, डीएलपी प्रोजेक्टर आदि यंत्रसामुग्री खरेदी करण्यात येणार आहे.

आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयास आवश्यक असणारी व विशेषतः राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने आपल्या तपासणी सुचविलेली यंत्रसामुग्री या महाविद्यालयास मिळवून देण्यासाठी या विभागाच्या लोकप्रतिनिधी आ. नमिता मुंदडा यांनी सातत्याने राज्य शासनाच्या औषधी द्रव्ये व संशोधन संचालनालयाकडे पाठपुरावा केला होता. सदरील पाठपुराव्यामुळे या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध विभागांतील यंत्रसामग्री खरेदी साठी १ कोटी ३९ लाख ५ हजार ५०० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker