डॉ. ज्योती डावळे यांना सहयोगी प्राध्यापक म्हणून पदोन्नती


स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. ज्योती अरुण डावळे यांना महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालनालयाच्या वतीने सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली आहे.
डॉ. ज्योती डावळे या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रथम अधिष्ठाता कै. व्यंकटराव डावळे आणि माजी मुख्यमंत्री कै. शिवाजीराव निलंगेकर पाटील यांच्या नात व प्रख्यात सर्जन डॉ. अरुण डावळे व प्रख्यात स्त्री रोग तज्ञ डॉ. चंद्रकला डावळे यांच्या कन्या आहेत.


प्रथम अधिष्ठाता कै. डॉ. व्यंकटराव डावळे यांच्या नंतर डॉ. अरुण डावळे व सौ. चंद्रकला डावळे यांनी यापुर्वी या वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्जरी व स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र विभागात आपली सेवा केली आहे. आता के. व्यंकटराव डावळे यांच्या तिसऱ्या पिढीतील डॉ. किरण अरुण डावळे हे मेडिसीन विभागात तर डॉ. ज्योती अरुण डावळे या स्त्रीरोग व प्रसुती शास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.


डॉ. ज्योती डावळे यांची ओळख नवीन पिढीतील एक अभ्यासू, कार्यतप्तर आणि कार्यकुशल डॉक्टर आणि सहयोगी प्राध्यापक म्हणून आहे. सदरील पदोन्नतीबध्दल डॉ. ज्योती डावळे यांचे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, विभाग प्रमुख डॉ. गणेश टोणगे, मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार माध्यम डिजिटल न्युज नेटवर्क चे संपादक सुदर्शन रापतवार व वैद्यकीय महाविद्यालयाच्या इतर विभाग प्रमुखांनी व सहयोगी प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे