महाराष्ट्र

अंबाजोगाई येथे अधुनिक कारागृहासाठी ३० एकर जागा मोजणीची प्रक्रिया पुर्ण

डॉ.सौ. विमल मुंदडा यांनी दाखल केला होता प्रस्ताव आ. नमिता मुंदडा यांनी केला पाठपुरावा!


अंबाजोगाई येथे अधुनिक कारागृह बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या ३० एकर जमीन मोजणीची प्रक्रिया आज पुर्ण झाली. ही जमीन मोजणी प्रक्रिया पुर्ण करुन घेण्यासाठी जिल्हा कारागृह अधीक्षक, भुमी अभिलेख उप अधिक्षक आणि तहसील कार्यालयाच्या महत्वाचे अधिकारी आज मोजणी स्थळी तळ ठोकून होते.
अंबाजोगाई येथील पुर्वापार असलेले उपजिल्हा कारागृह नादुरुस्त इमारतीमुळे बंद करण्यात आल्यानंतर शहर परिसरात अधुनिक कारागृह बांधण्यासाठी मागणी पुढे आली होती. तत्कालीन पालकमंत्री डॉ. सौ. विमल मुंदडा यांच्या कार्यकाळात या संबंधीचा प्रस्ताव राज्याच्या गृह विभागाकडे सादर करण्यात आला होता. या मागणीचा सतत पाठपुरावा करीत अंबाजोगाई शहरानजीक असलेल्या काळवीट तांडा परिसरातीलस.नं./इ.नं.१//५ मधील २५ ते ३० एकर शासकीय जागा या प्रकल्पासाठी उपलब्ध करून देणेबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला होता.

या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने ११ मे २०२३ रोजी एका कार्यालयीन पत्राद्वारे उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांना सदरील जमीन उपलब्ध करून देण्याच्या सुचना केल्या होत्या.
संदर्भीय पत्रात उप अधीक्षक भुमी अभिलेख यांचा मोजणी नकाशा, तलाठी मंडळ अधिकारी यांचा स्थळपहाणी पंचनामा/अहवाल, जागा बांधकामास योग्य आहे का नाही या संदर्भात कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा अहवाल, प्रस्तावित जमीन धरणाच्या पाणलोट क्षेत्र व लाभ क्षेत्रात येत काय? या बाबतची माहिती, नगर रचनाकार यांचे अभिप्राय याची खात्री तहसीलदार अंबाजोगाई यांनी करुन स्वयंस्पष्ट अभिप्रायासह परिपुर्ण प्रस्ताव मुळ प्रतिसह या कार्यालयास सादर करावा असे म्हटले होते.


वरील सर्व बाबींची पूर्तता करत आज संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत काळवीट तांडा परिसरातील ३० एकर जागा मोजणीची प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. सदरील प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करण्यात आल्यानंतर या जागेवर आधुनिक कारागृह बांधण्यासाठीचा मार्ग मोकळा होणार आहे.

आ. नमिता मुंदडा यांनी केला पाठपुरावा!

बीड जिल्ह्याच्या तत्कालीन पालकमंत्री डॉ.सौ. विमल मुंदडा यांनी दाखल केलेल्या प्रस्तावास मुर्त स्वरुप आणण्यासाठी डॉ. सौ. विमल मुंदडा यांच्या स्नुषा विद्दमान आ. नमिता मुंदडा यांनी सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता. याच प्रक्रियेतुन आज या आधुनिक कारागृह बांधण्यासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता आ. नमिता मुंदडा यांच्या मार्गदर्शना खाली पूर्ण झाली.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker