वाण खो-यातुन वाहुन गेलेल्या पाण्याची नोंद घेऊन बुट्टेनाथ साठवण तलावास तात्काळ मंजूरी द्दा; सुदर्शन रापतवार


या वर्षी पावसाळ्याच्या शेवटच्या टप्यात अवघ्या सहा दिवसात गोदावरी खो-यातील वाण उपखो-यात मोठा पावूस झाला. आणि या वाण खो-यातुन शकडो दशलघमी पाणी वाया गेले, या वाया गेलेल्या पाण्याची नोंद घेवून गेली अनेकवर्षे पाणी उपलब्धतेच्या प्रमाणपत्रासाठी आडवणुक करणा-या नाशिक येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयाने या सठवण तलावाच्या निर्मितीसाठी अडवून ठेवलेला रस्ता मोकळा करुन द्यावा व राज्य शासनाने या साठवण तलावाच्या निर्मितीस मंजूरी द्यावी अशी मागणी जलसहयोग चळवळीचे कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, अंबाजोगाई शहरातील १.५ लोकांची तहान भागवण्यासाठी शहर वासीयांच्यावतीने राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडे गेली अनेक वर्षापासून गोदावरी खो-यातील वाण उपखो-यातील वाण नदीवर साठवण तलाव बांधण्याची मागणी करण्यात येत आहे. या मागणी संदर्भातील पहिला प्रस्ताव साधारणपणे २०१० साली राज्यशासनाच्या जलसंपदा विभागाकडे सादर करण्यात आला असुन अंबाजोगाई शहराच्या उत्तरेस अंदाजे २ किमी अंतरावरील नागनाथ मंदीराच्या वरील बाजूस वाण नदीवर २१५.१४ चौकिमी पाणलोट क्षेत्र दाखवण्यात आले असुन हा साठवण तलाव निर्माण करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.


या नियोजित साठवण तलाव स्थळी ५०% विश्वासहार्यतेने प्रकल्पस्थळी एकूण उपलब्ध येवा ५१.०४६ दलमी दाखवण्यात आला असून साठवण तलावासाठी फक्त १४.५० दलघमी जलसंपत्तीचा वापर प्रस्तावित करण्यात आला आहे.
या साठवण तलावाच्या मंजुरी साठी आवश्यक असलेल्या पाणी उपलब्धतेच्या प्रमाणपत्रासाठी हा संपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाच्या एकमेव असलेल्या नाशिक येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात या साठवण तलावाच्या ब्रहत आरखड्यासह अंबाजोगाई येथील कार्यकारी अभियंता कार्यालयाने औरंगाबाद येथील गोदावरी मंडळ पाटबंधारे वमि कार्यालयाकडे व या कार्यालयाने गोमपावमि/तां-४/मगो/पाणी उपलब्धता/८२८ दि. २१/०१/२०१२ रोजी सादर करण्यात आला आहे.


सदरील प्रस्ताव या कार्यालयाने पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी पाठवला आहे, तो आज पर्यंत ही प्रलंबीत आहे. किंबहुना वाण उपखो-यात पाणी उपलब्ध नसल्याचे सांगत संबंधित कार्यालयाने पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र अद्दापही दीले नसल्यामुळे या साठवण तलावास मंजुरी मिळु शकली नाही.
मध्य गोदावरी खो-यातील वाण उपखो-यातील वाण नदीवरील या साठवण तलावास मंजुरी मिळण्यासाठी केज विधानसभा मतदार संघाच्या तत्कालीन माजी मंत्री ऍड. पंडितराव दौंड, आमदार डॉ. सौ. विमल मुंदडा, पृथ्वीराज साठे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी आमदार प्रा. सौ. संगिता ठोंबरे, माजी आमदार संजय दौंड, विद्दमान आमदार नमिता अक्षय मुंदडा व माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आज पर्यंत विशेष प्रयत्न केले आहेत.


या प्रकल्पास राज्य शासनाकडून तत्वत: मान्यता मिळवून आणण्यात माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना यश यश ही आले होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात या साठवण तलावास शासन पत्र क्र. २०१०/१४५१/(८/२०१०) जसअ दि.३/०४/२०१३ अन्वये तत्वत: मान्यता मिळवल्याचे व जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दि. २३/०७/२०१२ रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार पाणी उपलब्धते बाबत मंजुरी देण्यासंदर्भात आदेशीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ही फक्त राजकीय खेळीच ठरली. याबाबत पुढील काळात ठाम अंमलबजावणी अद्याप पर्यंत होवू शकली नाही.


वरील सर्व संदर्भ लक्षात घेता व पाणी उपलब्धता प्रमाणपत्रासाठी १९६० पुर्वी केरळ राज्यातील डॉ. केरळ राव यांनी घालुन दिलेल्या ७५% विश्वासहार्यता ग्राह्य धरुन पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र देण्याची चुकीची पध्दत कालबाह्य ठरवून प्रत्येक पाच वर्षात होणा-या एका वर्षातील सर्वाधिक होणा-या पावसाच्या पाण्याची उपलब्धता लक्षात घेवून गेली अनेक वर्षे पाणी उपलब्धतेच्या प्रमाणपत्रासाठी अडकून पडलेल्या या बुट्टेनाथ साठवण तलावास तातडीने पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र देवून या साठवण तलावास तातडीने मंजुरी देण्यात यावी व पुढील काळात वाण उपखो-यातुन वाहुन जाणा-या शेकडो दलघमी पाण्याची साठवणुक करण्यात यावी अशी मागणी जल सहयोगचे कार्यकर्ते सुदर्शन रापतवार यांनी केली आहे.