गुडघेदुखी आणि मणक्यांच्या विकारावर होमिओपॅथी मध्ये प्रभावी उपचार
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230923_162426-1024x891.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230923_162426-1024x891.jpg)
सर्वसामान्य माणसांचे जीवन अस्वस्थ करणा-या गुडघेदुखी आणि मणक्यांच्या विकारावर होमिओपॅथी औषधीप्रणाली आणि शरीराच्या योग्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून कायमस्वरूपी प्रभावी उपचार करण्यात येतात असे मत प्रख्यात होमिओपॅथी तज्ञ डॉ. उत्तरेश्वर पाचेगावकर यांनी व्यक्त केले.
मातृ सोसायटी फॉर रिसर्च इन इंटीग्रल हेल्थ ऍण्ड एज्युकेशन व रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी या संस्थेच्या पुढाकाराने पाचेगावकर होमिओपॅथी क्लिनिक च्या सभागृहात “गुडघेदुखी आणि मणक्यांच्या विकारांचे व्यवस्थापन” या विषयावरील मार्गदर्शन सत्रात डॉ. उत्तरेश्वर पाचेगावकर यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी डॉ. निशिकांत पाचेगावकर, डॉ. सुवर्णा पाचेगावकर यांच्यासह शहरातील गुडघेदुखी आणि मणक्यांच्या विकाराने त्रस्त असलेले अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230923-WA0210-1024x682.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230923-WA0210-1024x682.jpg)
दोन तास चाललेल्या या मार्गदर्शन सत्रात डॉ. उत्तरेश्वर पाचेगावकर पुढे म्हणाले की, गुडघेदुखी हा अतिशय त्रास दायक असा आजार आहे. पायाच्या सांध्यावर शरीरातील सर्व सांधे अवलंबून असतात. त्यामुळे गुडघेदुखी हा आजार गंभीरतेने घ्यायला हवा.
गुडघेदुखी हा आजार मुळात: गुडघ्याच्या दोन हाडातील कार्टीलेज कमी झाल्याने होतो. हाडातील दोन सांध्यांमध्ये असलेले हे कार्टीलेज दोन गुडघ्यामधील घर्षण कमी करतात आणि हे कार्टीलेज कमी झाले की, दोन सांध्यांमध्ये घर्षण जास्त होवू लागते आणि गुडघेदुखी चा त्रास जाणवण्यास सुरुवात होते. गुडघ्या भोवतीचे स्नायु मजबूत झाले की पुन्हा दोन सांध्यांमध्ये कार्टीलेज पूर्ववत वाढण्यास मदत होते आणि गुडघेदुखी चा त्रास कमी होतो.
आपल्या विस्तारीत मार्गदर्शनात डॉ. पाचेगावकर पुढे म्हणाले की, पेनकिलरच्या गोळ्या हा गुडघेदुखी च्या आजारांवर विलाज नाही, उलट त्या गुडघ्यांची झीज वाढवतात. गुडघेदुखी चा आजार कमी करण्यासाठी औषधां सोबतच शरीराच्या हालचालींचा सहभाग अधिक महत्त्वाचा असतो. शरीराच्या योग्य हलचाली, व्यायाम आणि होमिओपॅथी ची औषध याव्दारे गुडघेदुखी चा आजार हमखासपणे कमी करता येतो.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230923-WA0202-1024x682.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230923-WA0202-1024x682.jpg)
प्रत्येक माणसाच्या शरीरात २०० च्या वर हाडे असतात आणि त्या सर्व हाडांचा आकार वेगवेगळा असतो.
लोखंडामध्ये जेवढी शक्ती असते तेवढी शक्ती हाडामध्ये असते मात्र लोखंडा च्या तुलनेत हाडांचे वजन ५० पटीने हलके असते. शरीराला फ्रेम देणं हे हाडांच्या आकारावर अवलंबून असते. आपल्या शरीरातील हाडे ही मजबूत आणि लवचिक आहेत, त्याला सहजासहजी क्रॅक जात नाही. जी हाडे पौष्टिक आणि लवचिक आहेत त्या हाडांना क्रॅक जात नाही मात्र जी हाडे कमकुवत झाली त्या हाडांना लवकर फ्रॅक्चर होते.शरीरातील सर्व स्नायूंचा आणि अवयवांचा व्यायाम नियमित चालू असेल तर हाडे सतत मजबूत राहतात.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230923-WA0207-1024x682.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230923-WA0207-1024x682.jpg)
हाडे ठिसूळ होण्याची कारणे शोधून त्यावर उपाय योजना करण्याची गरज असते. व्हिटॅमिन डी-३ ने हाडे मजबूत होतात. तसेच शरीराला सतत ऍक्टींव्ह ठेवल्यामुळे ही हाडे मजबूत होतात.
हाडे आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी चालणे खूप महत्त्वाचे आहे. सतत चालण्यामुळे पोटरी चे मसल कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतात. चालण्यामुळे शरीरातील स्नायू बळकट होतात, स्नायू आणि -हदय सशक्त बनते. यासर्व बाबी लक्षात घेता गुडघेदुखी आणि मणक्यांच्या विकारावर व्यायाम, आहार आणि होमिओपॅथी औषधीप्रणाली याव्दारे सहज आणि कायम स्वरुपी मात करता येते असे डॉ. उत्तरेश्वर पाचेगावकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230923-WA0208-1024x682.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230923-WA0208-1024x682.jpg)
या कार्यक्रमात डॉ. सुवर्णा पाचेगावकर यांनी योगासना च्या माध्यमातून गुडघेदुखी आणि मणक्यांच्या विकारावर मात करण्यासाठी कशी मदत होते, कोणत्या पध्दतीची योगासने आणि दीर्घ श्वसन पध्दतीने या आजारावर कशी मात करता येते या बाबतचे मार्गदर्शन केले.
डॉ. निशिकांत पाचेगावकर यांनी आपली नियमित दिनचर्या, जीवनशैली, आहारविहार, पाणी पिण्याच्या सवयी याव्दारे विविध आजार कसे नियंत्रणात आणता येवू शकतात या संदर्भात मार्गदर्शन केले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230923-WA0206-1024x682.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230923-WA0206-1024x682.jpg)
या कार्यक्रमात प्रा. शांतीनाथ बनसोडे, विकास सत्वधर यांनी होमिओपॅथी औषधांमुळे आपल्या आजारावर कसे नियंत्रण मिळवले ते सांगितले तर सुदर्शन रापतवार यांनी विविध आजारांवर होमिओपॅथी औषधीप्रणाली व्दारे कसे नियंत्रण मिळवता येईल यासंबंधी मार्गदर्शन करणारे कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्यात यावेत अशी सुचना केली. या मार्गदर्शन शिबीरास रोटरी क्लबचे सचिव रो.गणेश राऊत, रो.माजी अध्यक्ष ऍड.अनंतराव जगतकर यांनी डॉ. उत्तरेश्वर पाचेगावकर यांचे स्वागत केले. “गुडघेदुखी आणि मणक्यांच्या विकारांचे व्यवस्थापन” या मार्गदर्शन शिबीरास शहरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.