अंबाजोगाईत ३० दिवसांनंतर पावसाचे आगमन; नागरिकांत समाधान
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230903_180554-1024x461.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230903_180554-1024x461.jpg)
अंबाजोगाई शहरात गेली ४० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज सायंकाळी पावसाचे आगमन झाले.
शहरात आज सायंकाळी पाच नंतर वातावरणात बदलाव तयार झाला. सकाळपासून आकाशात अधुनमधून आढळणारे पावसाचे ढग सायंकाळी पाच नंतर एकत्र जमण्यास सुरुवात झाली. चार-पाच मिनिटं वारा आला आणि मेघगर्जनेसह वरुणराजाने आपली हजेरी लावली.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230903_180609-1024x461.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/09/IMG_20230903_180609-1024x461.jpg)
शहरावर सगळीकडून पावसाचे ढग एकत्र जमू लागल्याने व अधुनमधून मेघगर्जना होत असल्याने या पासाचा जोर वाढेल अशी शक्यता दिसत आहे.
१ सप्टेंबर रोजी भारतीय हवामान विभागाने सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मध्यंतरात मेघ गर्जनएसह मराठवाड्यात सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला होता. याच वेळी सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता ही भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. आजच्या पावसाने हा अंदाज खरा ठरण्याच्या शक्यतोवर शिक्कामोर्तब केले असे म्हणावे लागेल.
यावर्षी सलग ३०ते ४० दिवस पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीन व इतर पिके हातची गेल्यात जमा आहेत, मात्र आजच्या पावसाने कशीबशी तग धरुन असलेल्या या पिकांना बळकटी मिळेल असे दिसते. याशिवाय कमी झालेली पाणी पातळी, जनावरांना आवश्यक असणारा हिरवा चारा, नदी नाल्यातील पाणी ही वाढेल. आजच्या पावसाने शेतकऱ्यांसह सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर आनंद जाणवणारे समाधान दिसून येत आहे.