डेंगु आजाराने अंबाजोगाईत १२ वर्षीय बालकांचा मृत्यू


अंबाजोगाई शहरात डेंगु आजाराने आपले डोके वर काढण्यास सुरुवात केली असून या आजाराने १२ वर्षीय नबी मिया समद मिया कुरेशी या मुलाचा बळी घेतला आहे.
अंबाजोगाई शहरात गेली अनेक दिवसांपासून डेंगु या आजाराने थैमान घालण्यास सुरुवात केली असून शहरातील डेंगु रुग्णांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे.
या आजाराने त्रस्त झालेल्या दमगानपुरा विभागात राहणा-या नबी मिया समद मिया कुरेशी या 12 वर्षाच्या मुलाचा डेंगयु ने मृत्यू झाला आहे.
शहरातील जुन्या विभागातील अनेक वस्त्यांमध्ये आणि नव्याने झालेल्या वस्त्यांमध्ये ही डेंगु चे रुग्ण वाढत चालले असले तरी नगर परिषदेच्या वतीने मात्र या रोगाला आळा घालण्यासाठी दुर फवारणी अथवा डेंग्यू चे डास कमी करण्यासाठी कसल्याही उपाय योजना प्रभावीपणे राबवताना दिसून येत नाही.
डेंगु आजाराने मयत झालेल्या नबी मिया समद मिया कुरेशी या १२ वर्षाच्या मुलाच्या निधनाबद्दल शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.