महाराष्ट्र
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीस केजचा पाठिंबा; आंदोलनाचा दिला इशारा!


लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा जाहीर करुन सर्व कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरु करा!


बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करावी अशी मागणी केज येथील रहिवाशांनी तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.


या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्माण करावा ही गेली अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. बीड जिल्ह्याचे एकुण भौगोलिक क्षेत्र आणि लोकसंख्या लक्षात घेता अंबाजोगाई जिल्हा निर्मिती होणे ही काळाची गरज बनली असून येत्या लोकसभा निवडणुकी पुर्वी अंबाजोगाई जिल्ह्याची निर्मिती करुन जिल्हा स्तरासाठी आवश्यक असलेली सर्व कार्यालये योग्य ती मनुष्यबळ पुरवून सुरु करण्यात यावी, अन्यथा या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

