मोरारजी बापू प्रभु वैजनाथांचे चरणी लीन; ना.धनंजय मुंडे यांनी केले सारथ्य


परळी येथील प्रभु वैजनाथांबध्दल पंधरा दिवसांपूर्वीच बेताल वक्तव्य करुन चर्चेत आलेले करीत संत मोरारी बापु यांनी आज प्रभु वैजनाथांच्या चरणी लीन होवून दर्शन घेतले. महाराष्ट्राचे कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी परळी रेल्वे स्थानकात उन वैजनाथांच्या मंदिरापर्यंत मोरारी बापू यांना घेऊन येणा-या गाडीचे स्वतः: सारथ्य केले. एवढेच नव्हे तर वैजनाथ मंदिराचा संपुर्ण परिसर मोरारी बापु यांचे समवेत फिरुन वैजनाथ देवस्थानच्या वतीने करण्यात येणाऱ्या सर्व विकास कामांची माहिती ही त्यानी यावेळी दिली.
रामचरितमानस या ग्रंथाचे प्रसिद्ध कथाकार मोरारी बापू यांनी आज (दि. ३१) परळी शहरातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते.
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मोरारी बापू यांचे परळी वैद्यनाथ रेल्वे स्थानकावर स्वागत केले. तसेच स्वतः वाहनाचे सारथ्य करत ते मोरारी बापू यांच्या समवेत वैद्यनाथ मंदिरात दर्शनावेळी उपस्थित होते.
रामचरितमानस या ग्रंथाचे प्रसिद्ध कथाकार मोरारी बापू हे तब्बल ९६० भक्तगणांसह देशातील बारा ज्योतिर्लिंगांच्या यात्रेवर असून त्यासाठी दोन विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दरम्यान आज तिरुपती बालाजी येथील दर्शन करून पहाटे सहाच्या सुमारास मोरारी बापू यांची ट्रेन परळी वैद्यनाथ येथे पोहोचली. धनंजय मुंडे यांनी मोरारी बापू यांना दर्शनासोबतच संपूर्ण मंदिर परिसर दाखवून त्याबद्दल माहिती दिली. यावेळी नमामी वैद्यनाथम व हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. दरम्यान, दर्शन करून पुढील प्रवासासाठी निघाताना मोरारी बापू यांनी आपल्याला राम कथेसाठी परळीत येण्याचे निमंत्रण दिले असून, लवकरच कथेसाठी परळीत येणार असल्याचे सांगितले.