गीत्ता जवळगाव रस्ता रुंदीकरणासाठी गळीत धान्य संशोधन केंद्राची जमीन संपादनास मान्यता
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/image_editor_output_image-60314952-1688988594063.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/image_editor_output_image-60314952-1688988594063.jpg)
अंबाजोगाई शहरालगत विस्तारीत होणा-या अंबाजोगाई गीत्ता जवळगाव या रस्त्याच्या दुतर्फा वाढत जाणा-या नवीन वसाहतींना रहदारीसाठी महत्वाचा ठरणा-या रस्ता रुंदीकरण करण्यासाठी कृषी विभागाच्या गळीत संशोधन केंद्राची ६८ आर जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय कृषी मंत्रालयाने घेतला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या मंत्रालयाने हा निर्णय क्रमांक ताबिक- २०२२/प्र.क्र.८०/१३ दि. २६ जुलै २०२३ नुसार हा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील शासन निर्णयात पुढे असे म्हटले आहे की, शासन निर्णय क्र. टिएसएफ-१०७२/११३३६५/- १, दि. ०४/१२/१९७३ च्या शासन निर्णया अन्वये प्रतिवर्ष प्रति प्रक्षेत्र रु.५/- नाममात्र भाडयाने (५) तालुका बिज गुणन केंद्र, अंबाजोगाई, जि. बीड, (२) कृषि संशोधन केंद्र, सोमनाथपूर, जि.लातुर व (३) कृषि संशोधन केंद्र, तुळजापूर, जि. उस्मानाबाद येथील एकूण २२०.२० हेक्टर प्रक्षेत्र स्थावर मालमत्तेसह वसंतराव नाईक मराठवाडा, परभणी याना लीज बेसीसवर जमीन हस्तांतरीत झालेली आहे. त्यापैकी गळीतधान्य संशोधन उपकेंद्र, अंबाजोगाई यांच्या अधिनरत एकूण १५.३९ हेक्टर क्षेत्र आहे. गळीतधान्य संशोधन केंद्र, अंबाजोगाई यांच्याकडील एकूण १५.३९ हेक्टर जमीनीपैकी अंबाजोगाई गित्ता जवळगांव रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक असलेली सर्व्हे नं. १६५ मधील रस्त्यालगतची ० हेक्टर ६८ आर जमीन गळीतधान्य संशोधन उपकेंद्राच्या उत्तर बाजूस अंबाजोगाई गित्ता- जळगाव रस्ता व वस्ती असून त्या बाजूस संरक्षण भिंत नसल्यामुळे प्रक्षेत्रावर पेरलेल्या पिकांचे मोकाट जनावरे, रानडुकरे व वाटसरू यांच्या त्रासामुळे मोठया प्रमाणात पिकाचे नुकसान होते. सदरील जमीनीचा मावेजा विद्यापीठास जमा करणे व संरक्षण भिंत बांधून देणे आवश्यक असल्याचे विद्यापीठाने कळविले आहे.
प्रस्तुत जमिन ही कृषि विभाग, महाराष्ट्र शासन, तालुका बिज गुणन केंद्र, अंबाजोगाई, जि. बीड यांच्या नावावर आहे. तालुका बिजगुणन केंद्राच्या जमिनी या तालुक्यांचा विकास होताना शहरी भागात आल्याने विविध खाजगी व्यापारी, सहकारी, शासकीय, निमशासकीय संस्थांकडून तालुका बिजगुणन केंद्राच्या जमिनींची मागणी वेगवेगळ्या प्रयोजनासाठी करण्यात येते. म्हणून शासनाने, शासन परिपत्रक क्र.साबिक २०११/प्र.क्र.४३/१. ए. दि.८ सप्टेंबर २०११ अन्वये तालुका बीजगुणन केंद्राच्या जमिनी कृषक अथवा अकृषक कामासाठी न देणेबाबत धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे.
शासनाने दि. ०८/०९/२०११ अन्वये तालुका बीज गुणन केंद्राच्या जमिनी कृषक अथवा अकृषक कामासाठी न देणे याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला आहे. परंतु रस्त्याचे प्रयोजन हे व्यापक जनहित पाहता अंबाजोगाई गित्ता जवळगाव रस्ता रुंदीकरण करण्याकरीता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत गळीतधान्ये संशोधन उपकेंद्र, अंबाजोगाई येथील सर्व्हे क्र. १६५ मधील यालगतची ० हेक्टर ६८ आर जमीन संपादीत करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
अंबाजोगाई गित्ता जवळगाव रस्ता प्रतिमा ५८ रस्ता रुंदीकरणासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत गळीतधान्य संशोधन उपकेंद्र, अंबाजोगाई येथील ग्रामीण सर्व्हे नं. ५६५ मधील उजव्या बाजूची हेक्टर ६८ आर जमीन संपादीत करण्यासाठी सार्वजनिक शासन निर्णय क्रमांक साबिके २०२२/प्र.क्र.८०/१३- बांधकाम विभागास हस्तांतरीत करण्याकरिता महसूल व वन विभागाकडे प्रत्यार्पित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्याअनुषंगाने सदर जमीन महसूल व वन विभागाकडे प्रत्यार्पित करण्यात येत आहे. महसूल व वन विभागाच्या आदेशानंतर जमीन वाटप करताना जमिनीचा निश्चित कोणता हिस्सा प्रत्यार्पित करावयाचा आहे. या संदर्भात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बीड यांच्या सल्ल्याने
जिल्हाधिकारी, बीड यांनी जमिनीचे आरेखन निश्चित करून व मोजणी करुन जमीन हस्तांतरणाबाबतची कार्यवाही करावी.
हे ज्ञापन महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन , दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे उपसचिव हेमंत गोरखनाथ म्हापणकर यांच्या डिजिटल स्वाक्षरीने काढले आहे.
ना. धनंजय मुंडे, संजय दौंड यांचे विशेष प्रयत्न
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/image_editor_output_image-1553778893-1690521729749-300x285.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/image_editor_output_image-1553778893-1690521729749-300x285.jpg)
अंबाजोगाई शहरालगत असलेल्या गीत्ता-जवळगाव या रस्त्याच्या दुतर्फा नवनवीन वसाहती मोठ्या प्रमाणावर होत आहे. या नव्या विभागात सतत होणाऱ्या नवनवीन वसाहती मुळे या रस्त्यावरील गर्दी सतत वाढत चालली आहे. याशिवाय हा रस्ता पुढे गीत्ता जवळगाव बर्दापुर मार्गे लातुर ला जोडणारा महत्त्वाचा रस्ता ठरणार आहे. या रस्ता रुंदीकरणाची जुनी मागणी असून या मागणीसाठी विधान परिषदेचे माजी सदस्य संजय दौंड यांनी विद्दमान कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्फत सतत पाठपुरावा केला होता. सदरील रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला असल्यामुळे या विभागात राहणा-या नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.