महाराष्ट्र

“स्वाराती”च्या प्रश्नासंदर्भात आ. नमिता नमिता मुंदडा यांनी घेतली मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट

स्वतंत्र बैठक घेण्याचे मुश्रीफ यांचे आश्वासन

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील विविध अडीअडचणी आणि समस्यांसंदर्भात केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी बुधवारी (दि.२६) मुंबई येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. रूग्णालयाला भेडसावणाऱ्या विविध समस्या जाऊन घेतल्यानंतर मुश्रीफ यांनी लवकरच स्वाराती रुग्णालयासाठी स्वतंत्र विशेष बैठक घेण्याचे आश्वासन आ. नमिता मुंदडा यांना दिले.

अल्पदरात मिळणाऱ्या उत्कृष्ट उपचारांमुळे सर्वसामान्यांना स्वाराती रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचा मोठा आधार आहे. बीडसह आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यातील लोक उपचारासाठी स्वाराती रुग्णालयाला प्राधान्य देतात. त्यामुळे रुग्णालयात कायमस्वरूपी वर्दळ असल्याने येथील सर्वच यंत्रणांवर मोठा ताण आहे. त्यातच डॉक्टरांची अपुरी संख्या, त्यांच्या वारंवार इतरत्र होणाऱ्या बदल्या, अपुरा कर्मचारी वर्ग, यंत्रसामुग्रीची वानवा यामुळे अनेकदा रुग्णसेवा विस्कळीत होत असून गोरगरीब रुग्णांना याचा फटका बसत आहेत. आ. नमिता मुंदडा सातत्याने स्वाराती रुग्णालयातील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याबाबत त्यांनी शासनाकडे अनेकदा पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनासाठी मुंबईत असलेल्या आ. मुंदडा आणि अक्षय मुंदडा यांनी बुधवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट स्वाराती रुग्णालयातील समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आणि चर्चा केली. सर्व प्रश्न सखोलपणे जाणून घेत ना. मुश्रीफ यांनी लवकरच स्वाराती रुग्णालयासाठी स्वतंत्र बैठ बोलावून समस्या दूर करण्याचे आश्वासन आ. मुंदडा यांना दिले आहे. याबद्दल आ. मुंदडा यांनी ना. मुश्रीफ यांचे आभार मानले असून लवकरच स्वाराती रुग्णालयातील बहुतांशी समस्य दूर होऊन रुग्णसेवा सुरळीत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker