वैद्यनाथ ज्योर्तिलिंग संदर्भात कथीत संत मोरारी बापू यांचे बेताल वक्तव्य
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230726_152406-1024x658.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230726_152406-1024x658.jpg)
भाविकांनी व्यक्त केला निषेध
वादग्रस्त विधाने करुन चर्चे असलेल्या कथीत संत मोरारजी बापू यांनी अलिकडेच परळी वैजनाथ येथील पाचव्या ज्योर्तिलंगासंदर्भात बेमालूम वक्तव्य केले आहे. परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी नसून बारा ज्योर्तिलंगामधील खरे वैद्यनाथ हे झारखंड मधील देवघर येथील वैद्यनाथ धाम येथील वैद्यनाथ आहे असे बेताल वक्तव्य या वादग्रस्त मोरारजी बापू यांनी केले आहे. सदरील वक्तव्याबध्दल संताप व्यक्त करण्यात येत असून मोरारजी बापू़चा मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यात येत आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230726_152421-1024x726.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230726_152421-1024x726.jpg)
करीत संत मोरारजी बापू हे सतत वादग्रस्त विधाने करण्यामुळे चर्चेत असतात. मोरारजी बापू यांची सध्या व्दादश ज्योर्तिलिंग रामकथा यात्रा सुरू आहे. सदरील यात्रा ही देवघर येथे सुरू असताना त्यांनी परळी वैद्यनाथ संदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. आपल्या रामकथेतील प्रवचनात मोरारी बापू म्हणतात, “अनेक ज्योर्तिलंगा बाबत सध्या वाद सुरू आहे. कुणी म्हणतं हे ज्योतिर्लिंग येथे आहे, ते ज्योर्तिलंग तेथे आहे. वैद्यनाथ ज्योर्तिलिंग कुणी परळीत असल्याचे सांगते, कुणी देवघर मध्ये आहे असे सांगते. मात्र जिथे वैद्यनाथ आहेत तिथे आम्ही आहोत” मोरारी बापू पुढे म्हणाले की, “वैद्यनाथ ज्योर्तिलिंगाबाबत ही लोकं असेच म्हणतात. कोणी ते देवघर(झारखंड) येथे आहे असे म्हणतात तर कुणी ते परळी (महाराष्ट्र) येथे आहे असे म्हणतात तर कुणीते कांगडा (हिमाचल प्रदेश) येथे आहे असे म्हणतात. मात्र झारखंड मधील देवघर येथील वैद्यनाथ हाच बारा ज्योतिर्लिंगांमधील वैद्यनाथ आहे असे बेताल वक्तव्य त्यांनी केले आहे.
बारा ज्योर्तिलंगामधील वैद्यनाथ हा परळी वैजनाथ येथीलच वैद्यनाथ असून ते पाचशे ज्योतिर्लिंग आहे, असे अनेक पुरावे असून मोरारी बापू यांच्या या बेताल वक्तव्याचा संताप व्यक्त करीत अनेकांनी मोरारी बापू यांचा निषेध व्यक्त केला आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230726_160416-300x221.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230726_160416-300x221.jpg)
परळी वैजनाथ येथील भाविक आक्रमक
यासंदर्भात परळी वैजनाथ येथील भाविक आक्रमक झाले असून
प्रभू वैद्यनाथ,द्वादश ज्योतीर्लिंग,परळी- वैजनाथ,जि.बीड,महाराष्ट्र करिता भारत सरकार, मा.न्यायालय,भारतीय पुरातत्व विभाग व महाराष्ट्र-सरकारने गॅझेटद्वारे भारतातील बारा ज्योतीर्लिंगातील पाचवे ज्योतीर्लिंगाचे अस्तित्व अधिकृत करावे अशी मागणी केली आहे.
संत मोरारी बापूंच्या द्वादश ज्योतीर्लिंगाच्या यात्रेतून श्री.वैजनाथ ज्योतीर्लिंग परळीचे नांव वगळून वक्तव्याद्वारे झारखंड मधील वैद्यनाथ धामला ज्योतीर्लिंगाचे स्थान देऊन ज्योतीर्लिंग व धाम मध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे त्यामुळे भाविक-भक्तांमध्ये तीव्र संताप व निषेध व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र राज्यामधील स्वंयभू श्री. वैजनाथ ज्योतीर्लिंग परळी-वैजनाथ पुराण काळापासून धार्मिक,पुरातत्व, सामाजिक,एैतिहासिक,व भौगोलिक दृष्टया भारतातील बारा ज्योतीर्लिंगा पैकी पाचवे ज्योतीर्लिंग असल्यामुळेच काशी विश्वनाथ, उज्जैन महाकाल ज्योतीर्लिंगाप्रमाणे वैद्यनाथ ज्योतीर्लिंग परळीचा कॉरिडॉर व प्रसाद योजने अंतर्गतमध्ये समावेशाची मंजुरी मिळवण्याकरिताचा प्रस्ताव राज्य सरकारद्वारे भारत सरकारकडे पाठविण्याकरिता विद्यमान कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी लक्षवेधीद्वारे विधीमंडळात मांडली होती तसेच वैद्यनाथ कॉरिडॉर समिती,परळी वैजनाथच्या माध्यमातून याबाबतचा पाठपुरावा सुरु आहे परंतू संत मोरारी बापूच्या बारा ज्योतीर्लिंगाच्या दर्शन यादीत परळीच्या श्री.वैद्यनाथाच्या एेवजी झारखंडच्या वैद्यनाथ धामचा उल्लेख केला आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230726_160355-218x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230726_160355-218x300.jpg)
याचा तीव्र संताप भाविक-भक्तांमध्ये निर्माण झाला आहे.
प्राचीन काळापासून कांतीपुरी क्षेत्र तसेच अनोखी दक्षिण काशी यानावांने ओळखल्या जाणा-या शिवभक्तातातील लोकप्रिय असलेल्या प्रभू वैजनाथ पिंडीच्या बाजूला पार्वती माता अस्तित्वात अाहे.
राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज,अहमदपुरकर यांनी परळी-वैजनाथ नगरीतील वैजनाथच बारा ज्योतीर्लिंगातील एक असल्यामुळे तसेच परळी याठिकाणी पार्वती माताची चिताभूमी सुध्दा असल्याचे त्यांनी परळीतील केलेल्या 82व्या श्रावणमास तपोनुष्ठानात नमुद केले आहे.
काशी जगद्गुरू डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी सह अनेक जगद्गुरू व शिवाचार्यांनी श्री.वैजनाथ ज्योतीर्लिंग परळी वैजनाथ येथे तपोनुष्ठान केले आहेत.
त्यामुळे भारत सरकार ने पुरातत्व अभिलेख व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जिर्णोध्दार केलेल्या वास्तविक परळी वैजनाथ ज्योतीर्लिंगास सर्वार्थाने केंद्र सरकारच्या गॅझेटद्वारे अधिकृत मान्यता द्यावी अशी मागणी परळी वैजनाथ येथील ग्रामस्थांनी केली आहे.