डॉ. दिपक लामतुरे यांची MPSC च्या वतीने प्राध्यापक म्हणून निवड!


अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अस्थिरोग विभाग प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक डॉ. दिपक लामतुरे यांची महाराष्ट्र राज्य पब्लिक सर्व्हिस कमिशन (MPSC) निवड मंडळातर्फे प्राध्यापक म्हणून निवड करण्यात आली आहे.
अहमदपूर तालुक्यातील डॉ. दिपक लामतुरे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अस्थिरोग विभागातील आपले शिक्षण औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विभाग प्रमुख डॉ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण केले. पदव्युत्तर शिक्षण पुर्ण झाल्यानंतर डॉ. दिपक लामतुरे हे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थिरोग विभागात लेक्चरर म्हणून रुजू झाले होते. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थिरोग विभागात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करीत डॉ. दिपक लामतुरे यांनी सहाय्यक प्राध्यापक पदापर्यंत मजल मारली होती. अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. बुरांडे यांच्या अकाली निधनानंतर विभाग प्रमुख म्हणून डॉ. दिपक लामतुरे यांच्यावर जबाबदारी आली आणि वैद्यकीय शिक्षणात मागे पडलेला अस्थिरोग विभागप्रमुख त्यांनी पुढे आणला. या विभागात बंद पडलेले पदव्युत्तर शिक्षण त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करुन सुरु करण्यात त्यांना यश आले. आज त्यांच्याच प्रयत्नांमुळे अस्थिरोग विभागात ७ पदव्युत्तर विद्दार्थ्यांचा शिक्षणाचा लाभ घेता येत आहेत.
मागच्या वर्षीच डॉ. दिपक लामतुरे यांची प्राध्यापक म्हणून निवड व्हालयास हवी होती मात्र काही कारणास्तव ती होवू शकली नाही. डॉ. दिपक लामतुरे यांना महाराष्ट्र राज्य पब्लिक सर्व्हिस कमिशन (MPSC) निवड मंडळाचे पत्र आले असून प्राध्यापक म्हणून त्यांची निवड करण्यात आल्याचे त्यांना कळवण्यात आले आहे.
डॉ. दिपक लामतुरे यांच्या या निवडीबद्दल वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार, इएनटी विभाग प्रमुख डॉ. प्रशांत देशपांडे, सर्जरी विभाग प्रमुख डॉ. नितीन चाटे, अनॉस्थेशिया विभाग प्रमुख डॉ. अभिमन्यु तरकसे, एफ एम टी विभाग प्रमुख डॉ. राजेश कचरे, उप अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. राकेश जाधव या़च्यासह इतर विभाग प्रमुख व मित्र परिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे.