अंबाजोगाईत औद्योगिक वसाहतीसाठी शासकीय जागेची चाचपणी सुरु
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230719_204014-257x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230719_204014-257x300.jpg)
आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश
बीड जिल्ह्याच्या लोकनेत्या तत्कालीन पालकमंत्री डॉ. विमल मुंदडा यांनी राज्य शासनाकडे वरवंटी येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत निर्मितीसाठी पाठवलेला प्रस्ताव बारगळल्यानंतर आता विद्दमान आ. नमिता मुंदडा यांनी नवीन औद्योगिक वसाहत निर्मिती बाबतचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. या संदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे यांनी बीड जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून सदरील औद्योगिक वसाहतीसाठी अंबाजोगाई शहर परिसरात शासकीय जागा उपलब्ध आहे का? या संदर्भातील माहिती मागवली आहे.
अंबाजोगाई शहरासाठी नवीन औद्योगिक वसाहत निर्मितीसाठी या विभागाच्या आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या. प्रधान सचिव उद्दोग विभाग, महाराष्ट्र शासन यांचे कडे एका निवेदनाद्वारे मागणी केली होती.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/image_editor_output_image1485597563-1689779557461-300x227.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/image_editor_output_image1485597563-1689779557461-300x227.jpg)
या मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने घेतली असून औद्योगिक वसाहतीसाठी जागा उपलब्ध आहे का याची चाचपणी सुरू केली आहे. या संदर्भात औद्योगिक विकास महामंडळाचे चेतन गिरासे यांनी बीड जिल्हाधिकारी यांना एक पत्र दिले असून सदरील औद्योगिक वसाहतीसाठी अंबाजोगाई शहरालगत १० ते १५ किमी अंतराचे आत शासकीय जमीन उपलब्ध आहे किंवा कसे? या संबंधीची माहिती उपलब्ध करून देणे बाबत संबंधित उपविभागीय अधिकारी यांना आपल्या स्तरावरुन निर्देशीत व्हावे जेणे करून सदर माहिती उपलब्ध झाल्या नंतर शासकीय जमिनी लगत खाजगी क्षेत्राची आवश्यकते प्रमाणे निवड करुन प्रस्तावित क्षेत्राची पाहणी भउनइवड समिती मार्फत करण्यात येवून प्रस्ताव शासनाच्या आगामी उच्चाधिकार समिती समोर सादर करणे सुकर होईल असे म्हटले आहे.
संदर्भीय पत्रात अंबाजोगाई तहसीलदार यांना शहरालगतच्या गावरान, मोकळ्या जागा तसेच त्या लगतच्या खाजगी क्षेत्राचा अहवाल नकाशासह या कार्यालयास अवगत करावा असे म्हटले आहे.