प्रख्यात सराफा व्यापारी रावसाहेब टाक यांचे निधन


अंबाजोगाई येथील प्रगती ज्वेलर्स या सराफी पेढीचे मालक तथा सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब टाक यांचे -हदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज २३ जून रोजी सकाळी ८:१५ वाजता निधन झाले.
शहरातील मुख्य बाजारपेठत सराफी पेढीचे अतिशय भव्य दालन असलेल्या प्रगती ज्वेलर्स चे ते मालक होते. आज पहाटे पासूनच रावसाहेब टाक यांना श्वसनाचा त्रास होवू लागला होता. त्यांना उपचारासाठी सकाळी आठ वाजता स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले असता -हदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांची प्राणज्योत मालवली.
रावसाहेब टाक हे आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात काही वर्षे बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात कार्यरत होते. अंबाजोगाई तालुक्यातील मौजे येल्डा येथील जि. प. प्रा. शाळा येथे शिक्षक म्हणून त्यांनी अतिशय उत्कृष्ट कार्ये कले होते. पुढे सराफा व्यवसायात रुची घेत त्यांनी नोकरी सोडून धाडसाने सराफी व्यवसाय वाढवला. आपली विनयशील वागणुक आणि सहानुभूती पुर्ण वर्तवणुकीच्या बळावर त्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठत प्रगती ज्वेलर्स या दुकानाला अद्यावत दालन बनवले. याशिवाय शहरातील विविध भागात प्रत्येक भावांनाही स्वतंत्र सराफी दुकान निर्माण करुन देण्यात पुढाकार घेतला. या व्यवसायात अलौकीक अशी प्रगती साधत असतांनाच आज पहाटे -हदयविकाराने त्यांचेवर घाला घातला.
रावसाहेब टाक यांचे पश्चात पत्नी, दोन मुलं, एक मुलगी, नातवंडं , भाऊ-भावजया, त्यांची मुलं असा मोठा परिवार आहे. रावसाहेब टाक यांच्या अकाली आणि आकस्मिक निधनाने अंबाजोगाई शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज २३ जून रोजी सायंकाळी ६ वाजता रावसाहेब टाक यांचे पार्थिवावर बोरुळा तलाव स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारावेळी शहरातील सर्व व्यापारी, राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, आप्तेष्ट, स्नेही सहभागी झाले होते.