संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे उद्या अंबाजोगाईत होणार आगमण!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/06/IMG_20230613_140021-1024x579.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/06/IMG_20230613_140021-1024x579.jpg)
दत्तमंदिर नव्हे; यशवंतराव चव्हाण महाविद्यालय परिसरात होणार पालखीचा मुक्काम!
संत श्रेष्ठ श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखी शेगावहून २६ मे रोजी टाळकरी, वारकरी, पताकाधारी यांच्यासह मजल मजल दरमजल करत पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघाली आहे. हा पालखी सोहळा उद्या १४ जुन, बुधवारी सायकांळी अंबाजोगाई शहरात दाखल होणार आहे. यावर्षी पालखीचा मुक्काम दत्त मंदिराऐवजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार असल्याची माहिती संयोजक बालाजी कापसे यांनी दिली.
पालखीच्या मुक्कामाचे जुने नाते
शेगावीचा राजा श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचा अंबाजोगाई मार्ग गेली अनेक वर्षांपासून कायम आहे. सुरुवातीला ही पालखी शहरातील प्रमुख मार्गावरून श्री योगेश्वरी देवी मातेच्या दर्शनासाठी येत असे. याठिकाणी दर्शन झाल्यानंतर पालखीतील सर्व वारक-यांच्या भोजनाची व्यवस्था शहरातील व्यापारी मंडळी व भाविकांच्या सहभागाने करण्यात येते. योगेश्वरी मंदीर परिसरात पालखीतील सहभागी असलेल्या वारक-यांची जेवने झाली की, पालखी मुक्कामासाठी मुकुंदराज स्वामी यांच्या समाधी परिसरात जात असे. गेली १५ वर्षांपासून हा शिरस्ता बदलुन पालखीचा मुक्काम शहरातील दत्त मंदीर परिसरात होत होता. मात्र यावर्षी हा शिरस्ता मोडुन ही पालखी आता यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात मुक्काम करणार आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/06/IMG_20230613_135942-1024x546.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/06/IMG_20230613_135942-1024x546.jpg)
१५ जून रोजी पहाटे ४ ला महाअभिषेक व नंतर महाप्रसादाची व्यवस्था!
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय परिसरात पालखीचा मुक्काम झाल्यानंतर १५ जून रोजी सकाळी ४ वाजता गजानन महाराजांचा महा अभिषेक पुजा सुरु करण्यात येणार असून पुजा आरती झाली की महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसाद घेऊन सकाळी सात वाजता ही पालखी पुढील प्रवास मार्गस्थ करणार आहे.
संत श्री गजानन महाराजांच्या पालखी आगमनाची शहरवाशी, गजानन महाराज भक्त मंडळ, सेवेकऱ्यांच्या वतीने जय्यत तयार केली असुन केवळ आगमनाची प्रतिक्षा आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय परिसरात यावर्षी पालखीचा पहिलाच मुक्काम असल्याने यांची सर्व जबाबदारी संयोजक म्हणून बालाजी कापसे आणि मित्रमंडळी यांच्या वर राहणार आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/06/IMG_20230613_140045-1024x402.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/06/IMG_20230613_140045-1024x402.jpg)
स्वागताची झाली जय्यत तयारी!
श्रीसंत गजानन महाराजांची पालखी विठूरायाच्या दर्शनासाठी. पंढरपुर जात आसताना गेली अनेक वर्षापासून ही पालखी अंबाजोगाईच्या पावनभूमीत मुक्कामी थांबते. प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी श्रींची पालखी सोहळा जेष्ट वद्य एकादशी १४ जुन रोजी सायंकाळी अंबानगरीत दाखल होत असुन गजानन महाराज भक्त मंडळाच्या वतीने पालखी सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. हा सोहळा शहरातील भगवानबाबा चौकातून ढोलताश्या, टाळ, मृदंग व हरिनामाच्या गजरात, डॉ बाबासाहेब अंबेडकर चौक, बसस्थानक, मंडीबाजार मार्गे श्री योगेश्वरी मंदीर दर्शन व जेवण करुन छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मोंढा रोड, शासकीय विश्रामगृह मार्गे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा मुक्कामी थांबणार आहे. १५ जुन रोजी सकाळी महाप्रसाद घेऊन श्री पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. श्रीच्या पालखी दर्शन सोहळ्याचा लाभ शहरी, ग्रामीण भागातील भावीक भक्तानी घेण्याचे अवाहान करण्यात आले आहे.