महाराष्ट्र

यावर्षी आंतरभारतीचा स्नेहवर्धन पुरस्कार नेपाळचे नरपती कुंजेड यांना

१५ ऑगस्ट रोजी होणार वितरण !

आंतरभारती आंबाजोगाईच्या वतीने दर पंधरा ऑगस्ट रोजी दिला जाणारा स्नेहसंवर्धन पुरस्कार या वर्षी नेपाळचे राहणारे नरपती कुंजेडा यांना जाहीर करण्यात आला आहे.नरपती हे नेपाळ मधील जियेगाव फुलवारी येथील राहणारे आहेत. पंचवीस वर्षा पूर्वी मुलाच्या उपचारासाठी आंबाजोगाई येथे आले होते. त्यानंतर ते येथेच राहिले. मेडिकल कॉलेज परिसरात ते रात्रीचे वॉचमन म्हणून काम करतात.

नरपती हे नेपाळ मधील जियेगाव फुलवारी येथील राहणारे आहेत. पंचवीस वर्षा पूर्वी मुलाच्या उपचारासाठी आंबाजोगाई येथे आले होते. त्यानंतर ते येथेच राहिले. मेडिकल कॉलेज परिसरात ते रात्रीचे वॉचमन म्हणून काम करतात.

१० वा पुरस्कार; दशकपूर्ती समारोह!

अन्य राज्यातून येऊन आंबाजोगाई येथे स्थायिक झालेल्या व आंबाजोगाईच्या गौरवात भर घालणाऱ्या व्यक्तीला दर वर्षी 15 ऑगस्ट रोजी आंतरभारतीच्या वतीने स्नेहसंवर्धन पुरस्कर देऊन सन्मानित केले जाते. आतापर्यंत 9 पुरस्कार दिले गेले आहेत. हे या पुरस्काराचे 10वे वर्ष आहे. दशक पूर्तीच्या निमित्ताने पूर्वीच्या सर्व हयात सत्कारमूर्तींचा सन्मान केला जाणार आहे.

गावकऱ्यांच्या सहकार्यातून होतो पुरस्काराचा खर्च


या सत्काराला जास्तीजास्त गावकऱ्यांचा हातभार लागावा म्हणून फक्त 100 रुपयांचे अर्थसहाय्य स्वीकारले जाते. या वर्षीच्या स्नेहमीलन सत्कार सोहळ्याचे संयोजक महावीर भगरे व सहसंयोजक शरद लंगे गुरुजी राहणार आहेत. हे आयोजन आंतरभारती करीत असली तरी आंबाजोगाईच्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आंतरभारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमर हबीब व स्थानिक अध्यक्ष दत्ता वालेकर यांनी केले आहे .

बैठकीत ज्योती शिंदे, किरण देशमुख, महावीर भगरे, शरद लंगे, राहुल शिंदे, दत्ता वालेकर, अमर हबीब आदी उपस्थित होते.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker