महाराष्ट्र

मुरलीधर दसगावकर यांचे निधन

अंबाजोगाई शहरातील सेवानिवृत्त कृषी अधिकारी मुरलीधर गोविंदराव दसगांवकर यांचे वृद्धापकाळाच्या आजाराने औरंगाबाद येथे नुकतेच निधन झाले.
मुरलीधर दसगावकर हे महाराष्ट्र शासनाच्या मृदसंधारण विभागात सुरुवातीच्या काळात नौकरीस होते. पुढे हा विभाग कृषी खात्यात विलीन करण्यात आल्यामुळे मुरलीधर दसगावकर यांची निवृत्ती कृषी खात्यातुन झाली. आपल्या तरुण वयापासूनच त्यांनी आपले जीवन अत्यंत स्वाभिमानाने जगले. सेवानिवृत्ती नंतर त्यांनी आपले अण्णाभाऊ साठे चौकातील घर विकून पुणे येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला मात्र पत्नीच्या निधनानंतर ते परत अंबाजोगाईत स्थायिक झाले होते.


मागील काही दिवसांपासून वृध्दापकाळाच्या आजाराने त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यामुळे त्यांनी आपला मुक्काम औरंगाबाद येथे त्यांचा नातु अभिषेक दिलीप दसगावकर याचे कडे हल्ला. औरंगाबाद येथे वृध्दापकाळाच्या आजारावर उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुरलीधर दसगावकर यांच्या अंतीम इच्छेनुसार त्यांचे पार्थिव औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दान करण्यात आले. त्यांचे पश्चात त्यांचा नातु अभिषेक आणि त्याचा परिवार आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker