महाराष्ट्र

स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय निवास वीजसंच दुरुस्ती साठी ५.८१ कोटी

आ. नमिता मुंदडा यांनी केले विशेष प्रयत्न

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वर्ग १ ते वर्ग ४ च्या कर्मचारी निवासी जुन्या इमारतींनी नवी वीज संच मांडणी होणार असुन या प्रवर्गातील सर्व विवाहांना अंतर्बाह्य नवीन वीज संच मांडणी होणार असून या साठी ५ कोटी ८१ लक्ष ६७ हजार ६४० रुपयांच्या निधीला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने मान्यता मिळाली आहे. यासाठी आ. नमिता मुंदडा यांचे विशेष प्रयत्न कामाला आले आहेत. या आदेशावर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे अवर सचीव मी.वि. जोगदंड यांची स्वाक्षरी आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या शासन निर्णय क्र. एस एच ए-२०२२/प्रा.क्र.१४१/प्रशा-१, दि. १२ हे २०२३ च्या आदेशान्वये या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. या शासन निर्णयात पुढे असे म्हटले आहे की, सदरील विभागाच्या नियंत्रणाखालील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथील या संस्थेतील वर्ग १, वर्ग २, वर्ग ३ आणि वर्ग ४ निवासस्थान इमारतीच्या वीज संच मांडणीचे उपयोगिता आयुर्मान संपुष्टात आलेले आहे. त्यामुळे सदर संस्थेत नव्याने वीज संच मांडणी करणे अत्यंत आवश्यक आहे. तद्नुषंगिक या कामाकरीता खालील विवरणपत्रात नमूद एकूण रु. ५,८१,६७.६४०/- (अक्षरी रुपये पाच कोटी, एक्क्याऐंशी लक्ष, सदुसष्ट हजार सहाशे चाळीस फक्त) इतक्या रक्कमेच्या बांधकाम अंदाजपत्रकास पुढील अटी व शर्तींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

१) प्रस्तुत काम पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येत असल्यास संबंधित विभागाची तसेच तत्सम प्राधिकरणे यांची पूर्व परवानगी घेण्यात यावी.
२) तांत्रिक मंजूरी देताना राज्य दरसूचीबाह्य बाबांच्या दराकरीता शासन परिपत्रक क्रमांक-
२०१७/प्र.क्र. ११ / नियोजन-३, दिनांक ११.०४.२०१७ नुसार कार्यवाही करण्यात यावी.
३) प्रस्तावातील खरेदीशी संबंधित बाबींकरिता ई-निविदा प्रणालीचा अवलंब करुन उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाकडील दिनांक २४.०८.२०१७ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित
केलेल्या सूचना विचारात घ्याव्यात.
एसएचए-२०२२/प्र.क्र.१४१/प्रशा-१
४) प्रत्यक्ष काम करतेवेळी पर्यावरण विभाग, शासन निर्णय क्र. इएनव्ही २०१३ / प्र.क्र. १७७ / तां.क्र.१, दिनांक १० जानेवारी २०१४ मध्ये उल्लेख करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कार्यवाही करण्यात यावी.
५) विद्युतीकरण कामाच्या कालावधीतच बाबत तसेच इतर अनुषंगिक कामांचे योग्य नियोजन करून सदर कामे पूर्ण करावीत.
६) प्रस्तावित उपरोक्त वीज संच मांडणीचे काम ज्या इमारतीवर करण्यात येणार आहे त्या
इमारती सदर काम करण्यासाठी सुरक्षित व मजबूत आहे, याबाबत सक्षम प्राधिका-याची मान्यता घेण्यात यावी.
७) विषयांकित कामाकरिता सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता लागणार नाही. यादृष्टीने विशेष दक्षता घेऊन काम करण्यात यावे. सदर बांधकामासाठी येणारा खर्च खालील लेखाशीर्षात मंजूर होणाऱ्या निधीतून
भागविण्यात यावा.

वीज जोडणी झाली कालबाह्य

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेनंतर वर्ग १ ते वर्ग ४ च्या कर्मचारी निवासासाठी बांधण्यात आलेल्या सर्वच इमारती या आता कालबाह्य झाल्या असून अनेक कर्मचारी या जुन्या इमारतीत राहण्यास पसंती न देता खाजगी भाड्याच्या रुम मध्ये राहण्यास पसंती देत आहेत. यापुर्वीच या निवासस्थानात राहणा-या कर्मचाऱ्यांनी या इमारतीत सर्व सुविधा पुरवण्यात याव्यात अशी मागणी व आंदोलनेही केली होती.

आ. नमिता मुंदडा यांचे मानले आभार!

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या वर्ग १ ते वर्ग ४ च्या निवासस्थानाची दुरावस्था लक्षात घेता आ. नमिता मुंदडा यांनी या निवासस्थानाच्या दुरुस्ती आणि नवीन वीज संच जोडणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष पुढाकार घेतला होता. यापैकी या सर्व निवासस्थानाच्या नवीन वीज संच जोडणी विशेष प्रयत्न करुन ५कोटी ८१ लक्ष ६७ हजार ६४० रुपयांचा निधी मंजूर करुन आणण्यासाठी त्यांना यश आले आहे. या निधीतुन अत्यंत उच्च दर्जाची व सर्व सोयी लक्षात घेऊन नवीन वीज संच जोडणी करून घेण्यात येईल असा विश्वास आ. नमिता मुंदडा यांनी दिला आहे. सदरील प्रयत्नांबद्दल आ. नमिता मुंदडा यांचे वैद्यकीय इमारत वसाहतीत राहणा-या कर्मचाऱ्यांनी विशेष आभार मानले आहेत.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker