महाराष्ट्र

हज यात्रेकरूंच्या प्रश्नांसाठी पंकजा मुंडे यांनी घेतला पुढाकार

विमान तिकीट दरातील तफावत दुर करण्यासाठी अल्पसंख्याक मंत्र्यांना पाठवले पत्र

हज यात्रेसाठी जाणाऱ्या मराठवाडयातील यात्रेकरूंच्या विमान प्रवासातील तिकिट दरात झालेली तफावत तात्काळ दूर करावी अन्यथा मुस्लिम बांधव हया पवित्र यात्रेला जाऊ शकणार नाहीत यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री स्मृती इराणी यांना आज पत्र पाठवून यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली.

जिल्हयातील तसेच मराठवाड्यातून मुस्लिम बांधव हज २०२३ साठी जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथून विमानाने हजसाठी रवाना होणाऱ्या बांधवांना यंदा तांत्रिक कारणामुळे ८८ हजार रूपये जादा भाडे द्यावे लागत आहे. या संदर्भात काल संध्याकाळी मुस्लिम बांधवांच्या एका शिष्टमंडळाने पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. मी स्वत: जातीने लक्ष घालुन हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा शब्द त्यांनी दिला होता, त्यानुसार आज सकाळी त्यांनी मुंबईत पोहोचताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अल्पसंख्यांक मंत्र्यांना पत्र लिहून यावर त्वरेने कार्यवाही करण्याची विनंती केली.

हज यात्रेसाठी मुंबईहून विमानाने जाण्यासाठी ३ लाख ४ हजार ८४३ रुपये प्रवास भाडे आकारण्यात येत आहे. तर त्याच प्रवासासाठी छत्रपती संभाजीनगर येथुन ३ लाख ९२ हजार ७३८ रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे मराठवाड्यातून हजला जाणाऱ्या मुस्लिम भाविकांना प्रति व्यक्ती ८८ हजार रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. इतर जिल्ह्याच्या तुलनेत ही खुप मोठी तफावत आहे. हे अतिरिक्त प्रवास भाडे कमी करावे अथवा मुंबई येथुन हजला जाण्यासाठी व्यवस्था करावी यासाठी संदर्भात भाजपाचे अल्पसंख्यांक नेते सलीम जहांगीर यांनी शिष्टमंडळासह पंकजाताई मुंडे यांची भेट घेतली होती. सकाळी मुंबईला पोहोचताच पंकजाताईंनी पंतप्रधान आणि स्मृती इराणी यांना पत्र पाठवून हज यात्रेकरूंचा प्रश्न त्यांच्या कानावर घातला आणि यावर १५ मे च्या आत कार्यवाही करण्याची विनंती केली.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker