गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230412_134108.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230412_134108.jpg)
केज मतदार संघात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई द्या अशी मागणी आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, केज विधानसभा मतदार संघातील (जि. बीड), केज तालुक्यातिल बनकरंजा, तांबवा, पिसेगाव, कुंबेफळ, चंदनसावरगा, जवळबन, केकतसारणी, ढाकेफळ, सह इतर गावात मागील आठ दिवसापासून प्रचंड वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारांचा पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गहू, ज्वारी सह फळबागांचे व भाजीपाला पिकांचे (सिमला मिरची) प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच प्रचंड वादळी वाऱ्यामुळे बऱ्याच घरावरील पत्रे उडाले असून शेतकऱ्यांचे शेतातील गोठे मोडले आहेत. तसेच मोठमोठे आंब्यासह इतर झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सदर नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे अत्यंत गरजेची आहे.
तरी केज विधानसभा मतदार संघातील केज, तालुक्यातील प्रचंड वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करणेबाबत आदेश देऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी आ.नमिता मुंदडा यांनी केली आहे.