मांजरा धरण क्षेत्रात जागतिक दर्जाचे जलपर्यटन केंद्र होण्याचा मार्ग मोकळा!


आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश
बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या धनेगाव येथील मांजरा धरण प्रकल्प परीसरात निर्माण करण्यात येणा-या आद्दकवी मुकुंदराज स्वामी उद्दान निर्मिती प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आ. नमिता मुंदडा यांनी या प्रकरणी गेली तीन वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.


धनेगाव येथील मांजरा धरण प्रकल्प परीसरात आद्दकवी मुकुंदराज स्वामी यांच्या नावाने अद्यावत उद्दान निर्माण करण्यात यावी अशी मागणी या विभागाच्या तत्कालीन लोकनेत्या स्व. डॉ. विमल मुंदडा यांनी राज्य शासनाकडे केली होती. डॉ. विमल मुंदडा यांच्या निधनानंतर या मागणीची फाईल शासनस्तरावर मंजूरीसाठी अडकुन पडली होती. या अद्यावत उद्धारासाठी मांजरा धरण काठावरची ३२ हे. जमीन आरक्षीत करण्यात आली असून सदर उद्दान विकसीत करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे.
या प्रलंबित प्रस्तावाची दखल घेत डॉ. विमल मुंदडा यांच्या स्नुषा तथा विद्यमान आ. नमिता मुंदडा यांनी गेली तीन वर्षांपासून शासनस्तरावर पाठपुरावा केला होता.


या अधिवेशनात आ. नमिता मुंदडा यांनी विचारलेल्या तारांकीत प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जागेवर लवकरच जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकासासाठी सर्वेक्षण आराखडा तयार करण्याचे निर्देश वरीष्ठ व्यवस्थापक जलपर्यटन आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मुंबई यांना देण्याबाबत कार्यवाही सुरु असल्याचे सांगितले.


आ. नमिता मुंदडा यांनी अधिवेशनात विचारलेल्या या तारांकीत प्रश्नांमुळे गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आद्दकवी मुकुंदराज स्वामी उद्दान निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असून या ठिकाणी जागतिक दर्जाचे जलपर्यटन स्थळ बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आ. नमिता मुंदडा यांनी गेली तीन वर्षे सातत्याने केलेल्या या प्रयत्नांबद्दल आ. नमिता मुंदडा यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.