१९ मार्च; अन्नत्याग आंदोलनास मिळणार यावर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230308_102839.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230308_102839.jpg)
उपवास करणाऱ्यांच्या संख्येत यावर्षी होणार विक्रम वाढ होणार
राज्यातीलच नव्हे तर देशभरातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांच्या पुढाकाराने १९ मार्च रोजी गेली सहा वर्षापूर्वी सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनास यावर्षी अंबाजोगाई शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी अन्नत्याग आंदोलनात सहभागी होणाऱ्यांच्या संख्येत विक्रमी वाढ होईल असे दिसते आहे. या वर्षापासून आयोजित करण्यात आलेल्या सर्वच उपक्रमास सर्व स्तरातुन अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संयोजक सुदर्शन रापतवार यांनी दिली.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230118-WA0027.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG-20230118-WA0027.jpg)
३५ वर्षापुर्वी साहेबराव करपे आणि सौ. मालती करपे यांनी आपल्या चार लहान मुलांसह १९ मार्च १९८६ रोजी सामुहिक आत्महत्या केली. ही सामुहिक आत्महत्या देशातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंदवली गेली. यानंतर राज्यात सातत्याने वाढ होणा-या शेतकरी आत्महत्या थांबाव्यात यासाठी आजपर्यंत एकाही शासनकर्त्याकडून प्रयत्न झाला नाही. राज्यातील या शेतकरी आत्महत्या थांबाव्यात यासाठी आणि शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने गेली अनेक वर्षांपासून ही मागणी शासन दरबारी रेटुन धरली आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230301_091748.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230301_091748.jpg)
शासन दरबारी पहिली शेतकरी आत्महत्याची नोंद ठरणा-या १९ मार्च हा दिवस आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी आणि अन्नदात्यासाठी अन्नत्याग करण्यासाठी निवडला गेला.किसानपुत्र आंदोलनाने गेली सहा वर्षापुर्वी सुरु केलेल्या या अन्नत्याग आंदोलनास यावर्षी संपुर्ण देशातीलच नव्हे तर विदेशातील किसानपुत्रांनी सहभाग नोंदवला आहे. शिवाय या आंदोलनास अंबाजोगाईत मोठा प्रतिसाद मिळत आहे.
शेतकरी आत्महत्या सहवेदना व्याख्यान माला
१९ मार्च रोजीच्या अन्नत्याग आंदोलना निमित्ताने यावर्षी अंबाजोगाई येथे यावर्षी किसान पुत्र अनिकेत डिघोळकर यांच्या पुढाकाराने सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सामुहिक उपवास करण्यात येणार आहे. या आंदोलनात शहरातील काही पत्रकार व विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभाग घेणार आहेत.
सायंकाळी ४ वाजता “शेतकरी आत्महत्या सहवेदना व्याख्यान माला” मधील पाहीले पुष्प महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे हे गुंफणार आहेत. सदरील व्याख्यान संपताच सामुहिक उपवास सोडण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व लंगोटीयार मॉर्निंग ग्रुपने स्विकारले आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/image_editor_output_image1146777365-1677833361586.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/image_editor_output_image1146777365-1677833361586.jpg)
विविध संघटना घेणार सक्रिय सहभाग
१९ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या या सर्व उपक्रमात ज्येष्ठ नागरिक संघ, रोटरी क्लब अंबाजोगाई, ब्राह्मण संघटन अंबाजोगाई, बहुभाषिक साहित्य संमेलन अंबाजोगाई, मराठी पत्रकार परीषद शाखा अंबाजोगाई, अंबाजोगाई पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ या सोबतच अनेक संघटनांनी आपण सक्रिय सहभाग घेणार असल्याचे कळवले आहे.
किसान पुत्रांना सहभागी होण्याचे आवाहन
शहरातील अनेक किसानपुत्र या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गेली अनेक दिवसांपासून नियोजन बद्ध काम करीत आहेत. यामध्ये सुदर्शन रापतवार, वैजनाथ शेंगुळे, वसंत मोरे, अनिकेत डिघोळकर, प्रा. शैलजा बरुरे, अनिता कांबळे, अनिरुद्ध चौसाळकर, महावीर भगरे, मुजीब काजी, कालिदास आपेट, पत्रकार दादासाहेब कसबे, दत्तात्रय अंबेकर, गजानन मुंडेगावकर, अभिजित गाठाळ, अविनाश मुंडेगावकर, प्रशांत बर्दापूरकर, रणजित डांगे, संतोष बोबडे, डॉ. सुरेश अरसुडे, चंद्रशेखर वडमारे, प्रा. पंडीत कराड, सुभाष बाहेती, शिवाजी कुलकर्णी, शेख जमील, बाबुराव मस्के, बाबुराव बाभुळगांवकर, पत्रकार दादासाहेब कसबे, प्रितम पन्हाळे, सौ. रेखा देशमख, पत्रकार किरण देशमुख, राहुल शिंदे, सौ. ज्योती शिंदे ,आशा अमर हबीब, जगदिश जाजु यांच्या सह अनेक जण काम करीत आहेत. या सर्व उपक्रमात शहरातील किसान पुत्रांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन स़योजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.