बहुभाषिक परिवर्तन साहित्यसंमेलनाचा अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा


अंबाजोगाई येथे ११ व १२ रोजी भरवण्यात येणाऱ्या पय
बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनाने किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा देवून या आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार असल्याचे जाहीर केले आहे.


बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनाच्या कार्यकारी मंडळाच्या वतीने अन्नत्याग आंदोलनाचे स्थानिक संयोजक सुदर्शन रापतवार यांना या संदर्भात देण्यात आलेल्या पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, महोदय, आपण अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या संदर्भात चालवत असलेले अन्नत्याग आंदोलन महत्वपूर्ण आहे. आपल्या आंदोलनातील सातत्य पाहून आम्ही प्रभावित झालो आहोत. त्या अनुषंगाने १९ मार्च २०२३ रोजी आपण आयोजित केलेल्या अन्नत्याग सत्यागृहात राज्यस्तरीय बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनातील कार्यरत असलेले कार्यकारी मंडळ व सदस्य सहभागी होत आहेत.


आपल्या अन्नत्याग सत्याग्रहास आम्ही १९ मार्च २०२३ या दिनी एकदिवस अन्नत्याग करून पाठींबा जाहीर करतो आहोत. आपले, कार्यकारी मंडळ, राज्यस्तरीय परिवर्तन साहित्य संमेलन, समिती अंबाजोगाई.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रति सहानुभूती व्यक्त करण्यासाठी १९ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या अन्नत्याग आंदोलनात बहुभाषिक परिवर्तन साहित्य संमेलनाचे डॉ. धर्मराज माले (अध्यक्ष), मुजीब काजी (कार्याध्यक्ष), सुरेश खंदारे (उपाध्यक्ष), डॉ. देवराव चामनर (सचिव), बालाजी शेरेकर (सचिव)
समीयोद्दीन मोमीन (सहसचिव), वसंतराव मोरे (कोषाध्यक्ष)
विद्याधर पांडे (कार्यकारी सचिव)


तसेच सल्लागार समितीचे सदस्य विश्वंभर वराट, ऍड. अनंत जगतकर, गोविंदराव देशमुख, संतराम कराड, तारेख अली उस्मानी, सखा गायकवाड, चंद्रकांत हजारे, गजानन मुडेगावकर, अनंत वेडे, प्रकाश बोरगावकर, प्रा. गौतम गायकवाड, शितल बोधले, ताहेर चाऊस, रावसाहेब घाडगे
बा.सो. कांबळे, शैलेश कांबळे, डॉ. प्रा. दिलीप भिसे, वीरेन्द्र गुप्ता,
सुंदर कदम, डॉ. प्रा. अनंत मरकाळे हे सहभागी होणार आहेत.