महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत माजलगावच्या शेतकऱ्याची मुलगी मुलींमध्ये १ ली तर गुणवत्ता यादीत ३ री
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/image_editor_output_image1488290605-1677664616584-300x191.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/image_editor_output_image1488290605-1677664616584-300x191.jpg)
नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये राज्यात महीला उमेदवारामधून प्रथम तर सर्वसाधारण गुणवत्ता यातीत तिसरा क्रमांक येण्याचा मान माजलगावची कन्या सोनाली अर्जुन मात्रे हिने पटकावला आहे. शेतकऱ्याची कन्या राज्यात प्रथम आल्याने माजलगाव सह संपूर्ण राज्यात ही अभिमानाची गोष्ट आहे.
आयोगाने 405 पदांसाठी 7, 8 व 9 में 2022 रोजी मुख्य परीक्षा घेतली होती. मंगळवार दिनांक 28 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामधे प्रमोद चौगुले यांनी 633 गुणांसह राज्यात पहिला क्रमांक पटकावला तर शुभम पाटीलला 1616 गुण मिळाले आहेत. शुभम पाटील दुसरा आला आहे. महिलामध्ये सोनाली मात्रे पहिली आहे, तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत सोनालीला तिसरा क्रमांक मिळाला आहे.
सोनाली ही माजलगाव तालुक्यातील ईरला मजरा येथील असून शेतकरी अर्जुन मात्रे यांची कन्या आहे. सोनालीच्या रुपाने रहिवाशी राज्यात MPSC परीक्षेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधिक्षक, तहसीलदार सह एकूण 20 पदांच्या 405 जागांसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.. तसेच संवर्गाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता 3 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत वेब लिंक उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.