४०० दिव्यांगांना मिळणार कृत्रिम अवयव, साहित्य व साधने


यशवंतराव चव्हाण सेंटर, महात्मा गांधी सेवा संघ व इतर सामाजिक संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग आरोग्य तपासणी शिबीरामध्ये तपासणी करण्यात आलेल्या ४६५ रुग्णांपैकी ४०० रुग्णांना कृत्रिम अवयव, साहित्य आणि साधने मिळणार आहेत.
सामाजिक न्याय व आधिकारीता मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली , जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद बीड, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अंबाजोगाई, यशवंतराव चव्हाण सेंटर व महात्मा गांधी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव,साहित्य व साधनांसाठी नोंदणी व तपासणी शिबीर अंबाजोगाई येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन कार्यालय येथे घेण्यात आले होते.


या शिबीर मध्ये मतिमंद , कर्णबधीर, अस्थिव्यंग,अंध आशा विविध व्यक्तींच्या नोंदणी व तपासणी करण्यात आल्या.
औरंगाबाद येथुन आलेले अस्थिरोग तज्ञ डॉ. नसीम काजीम खान व श्रवण तज्ञ ऋषीकेश सलगर यांनी अनेक अस्थिव्यंग व कर्णबधीर व्यक्तींची पाहणी केली. व दिव्यांग व्यक्तींच्या अवयवाचे मोजमाप केले.
अंबाजोगाई तालुक्यातील एकुण तपासणी साठी 560 दिव्यांग आले होते. त्यापैकी 404 दिव्यांग व्यक्ती तपासणीसाठी पात्र ठरले. यांमध्ये


अस्थिव्यंग – 182, कर्णबधीर – 83, अंध – 58, मतिमंद – 81 रुग्णांचा समावेश आहे.


या शिबीराचे उद्घाटन स्वा.रा.ती वैद्यकिय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॅा.मुकंद मोगरीकर यांच्या शुभहस्ते व वैद्यकिय अधिक्षक डॅा.राकेश जाधव , दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक व यशवंतराव चव्हाण सेंटर बीड जिल्हा चे सचिव डॉ. नरेंद्र काळे, वैद्यकिय अधिकारी डॅा.नागेश अब्दागीरे , वैद्यकिय अधिकारी डॅा.प्रशांत दहीरे , सौ.भताने, वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन कांबळे, संभाजी लांडे, यांच्या उपस्थितीत झाले .


या शिबीराचे आयोजन डॉ. नरेंद्र काळे (समन्वयक, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अंबाजोगाई तथा यशवंतराव चव्हाण सेंटर बीड जिल्हा) यांनी महात्मा गांधी सेवा संघाचे श्री. विजय कान्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले. याशिबीराच्या यशस्वितेसाठी उध्दव कदम व बोधवर्धिनी मतिमंद विद्यालयातील शिक्षक, बाबासाहेब परांजपे व कर्तव्य मतिमंद विद्यालयातील शिक्षक, आनंद टाकळकर यांच्या सह मनेश गोरे, इब्राहिम गवळी, सलिम शेख, ऋषी वाघमारे, प्रकाश बोरगावकर इ. नी प्रयत्न केले.