ठळक बातम्या

एक शेतकरी एक डिपी योजनेअंतर्गत २०० मीटरची अट शिथिल करा

आ. नमिता अक्षय मुंदडा यांची मागणी

केज विधानसभा मतदार संघात एचव्हीडीएस योजने अंतर्गत एक शेतकरी एक डी.पी. योजनेतील २०० मीटरची अट न ठेवता ती शिथिल करण्यात यावी व नियमित कामे करण्यात यावीत अशी मागणी आ.नमिता मुंदडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


या संदर्भात आ. नमिता मुंदडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, केज विधानसभा मतदार संघातील केज, अंबाजोगाई, बीड, उपविभागात ज्या ठिकाणी एजी ट्रान्सफार्मर ओव्हरलोड आहेत. त्याठिकाणी ट्रान्सफार्मर ओव्हरलोड असल्यामुळे शेतकऱ्यांनी एचव्हीडीएस योजनेअंतर्गत एक शेतकरी एक डी.पी योजनेत शेतीपंपास ट्रान्सफार्मर मिळेल या आशेने गरज नसतांना किंवा परिस्थितीने नवीन शेतीपंपाचे कोटेशन भरलेले आहेत. परंतु शासनाच्या निर्णया प्रमाणे २०० मीटरच्या आत एलटी लाईन असेल तेथे एजी पॉलीसी अंतर्गत पोल उभे करून केबलने जोडणी देणे आहे. परंतु ओव्हरलोड ट्रान्सफार्मरवर जोडणी दिल्यास कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध होत असून एक शेतकरी एक डी.पी योजनेत ट्रान्सफार्मर बसवण्याची मागणी होत आहे.


तरी केज, अंबाजोगाई, बीड, उपविभागात जे ट्रान्सफार्मर ओव्हरलोड आहेत तेथे अस्तित्वात असलेल्या ट्रान्सफार्मरचा लोड व्हीआर पाहून त्याठिकाणी एक शेतकरी एक डी.पी. योजनेत २०० मीटरची अट न ठेवता कामे करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केली आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker