लावण्याई पब्लिक स्कुल च्या वार्षिक संमेलनात विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन


येथील डीएसएम प्रतिष्ठान संचलित लावण्याई स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पोशाख परिधान धारण करत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोककलेचे विविध सांस्कृतिक आयाम सादर केले. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आकर्षक नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. विद्यार्थी स्नेहसंमेलनाचे उद्घाटन परळी शहराचे माजी नगराध्यक्ष बाजीराव ( भैय्या ) धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महिला, बालकल्याण व शिक्षण विभागाच्या माजी सभापती तथा मराठी नाट्य परिषदेच्या नांदेड शाखेच्या अध्यक्षा सौ अपर्णाताई हृषिकेश नेरलकर यांची उपस्थिती होती.


परळी येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या डॉ डी.जे. दंडे व्यासपीठावर संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर दैनिक दिव्य लोकप्रभाचे नांदेड येथील उपसंपादक प्रा.संतोष कुलकर्णी, डाॅ सुरेश चौधरी, लक्ष्मीबाई देशमुख महाविद्यालयाचे पदाधिकारी मंगेश संजय देशमुख, चेतन सौंदळे,डॉ. सुवर्णाताई टिंबे, डॉ वैभव डूबे, कुषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव बलवीर रामदासी मार्गदर्शक मधुकरराव गिरवलकर, अध्यक्ष पत्रकार अनंत कुलकर्णी, शाळेच्या प्राचार्या अस्मिता गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.


स्नेहसंमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा मधील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरीत करण्यात आली. स्नेहसंमेलनाचा भव्य दिव्य कार्यक्रम विद्युत रोषणाई, आधुनिक ध्वनी व्यवस्था व आकर्षक व्यासपीठाची उभारणी करून डॉ डी.जे. दंडे व्यासपीठावर घेण्यात आला. स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्या पुजा बिडवे, कविता विर्धे, हर्षदा परदेशी, संघमिञा पोटभरे, शेख सर त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार सुञसंचलन कांबळे सर यांनी केले,तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक पुजा बिडवे यांनी केले. अस्मिता गोरे, पुजा बिडवे, हर्षदा परदेशी संघमिञा पोटभरे, कविता विर्धे, शेख सर आदिचा बेस्ट टिचर्स म्हणुन शाळेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

