ठळक बातम्या

सोमनाथ अप्पा गिरवलकर यांचे निधन

अंबाजोगाई शहराजवळील धायगुडा पिंपळा येथील दुरदर्शन टॉवर जवळील स्वतः च्या जागेत लोकाश्रयावर सुरु केलेल्या व अल्पावधीतच लोकांच्या मनात घर निर्माण केलेल्या “आधार भक्तीप्रेम आश्रम” पिंपळा धायगुडा चे संचालक सोमनाथ अप्पा गिरवलकर यांचे काल रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.

विविध सामाजिक उपक्रम केले होते सुरु


सोमनाथ अप्पा गिरवलकर हे सुरुवाती पासूनच समाज कार्यात सक्रिय होते. भक्ति प्रेम वृध्दाश्रम सुरु करण्यापुर्वी सोमनाथ अप्पा गिरवलकर यांनी जय हनुमान तंत्रनिकेतन चनई, गजानन वाचनालय, गिरवली ता. अंबाजोगाई जि.बीड या सह अनेक सामाजिक उपक्रम सुरु केले होते. सोमनाथआप्पा गिरवलकर हे गेली अनेक दिवसांपासून उच्चरक्तदाब, मधुमेह, गुडघेदुखी व इतर आजाराने त्रस्त होते. या सर्व आजारांवर उपचार सुरु असतानाच काल रात्री अचानक त्यांची प्राणज्योत मालवली.

पवन गिरवलकर यांना पीतृशोक

धायगुडा पिंपळा येथे सुरु करण्यात आलेल्या भक्ती प्रेम आश्रमाचे संचालक पवन गिरवलकर यांचे ते वडील होते. त्यांचे पार्थिवावर आज १५ फेब्रुवारी बुधवार रोजी सकाळी 10 वाजता गिरवली ता.अंबाजोगाई जि.बीड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गिरवलकर कुटुंबियांच्या दुःखात माध्यम न्यूज नेटवर्क परिवार सहभागी आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker